घरदेश-विदेशहॉटेलच्या टेरेसवरून पडून एनआरआय व्यावसायिकाचा मृत्यू

हॉटेलच्या टेरेसवरून पडून एनआरआय व्यावसायिकाचा मृत्यू

Subscribe

दिल्लीच्या ताज मानसिंह हॉटेलच्या टेरेसवरून पडून ४८ वर्षीय एनआरआय व्यावसायिकाचा मृत्यु

दिल्लीतील ताज मानसिंह हॉटेलच्या टेरेसवरून पडल्याने ४८ वर्षीय एनआरआय व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लुटियन्स असे या व्यावसायिकाचे नाव आहे. या टेरेसवरून चुकून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंदर मंगलम हे अमेरिकेतील मेरीलँडचे रहिवासी असून त्यांनी मद्यपान केले होते. त्यानंतर ते टेरेस बागेत आराम करण्यासाठी गेले असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले.

मंगलम यांनी ७ नोव्हेंबरला पहाटे २.३० वाजता हॉटेलमध्ये चेक इन केले आणि ८ नोव्हेंबर रोजी तिथून जाणार होते. परंतू ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ ला हॉटेलच्या टेरेस त्यांचा मृतदेह सापडला. टेरेस बाग ही लॉबीच्या दोन स्तरांवर स्थित आहे. पोलिसांनी त्याला कोणतेही सीमा किंवा संरक्षक भिंत नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्यांच्या खोलीतून दारूच्या बाटल्या ही जप्त केल्या.

- Advertisement -

ही घटना घडल्यानंतर बंगळुरूमध्ये राहणाऱ्या मंगलमची आई दिल्लीत दाखल झाल्या आहेत. अमेरिकेत राहणारे त्यांचे कुटुंबीय शनिवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीत आले. हॉटेलने पीडिताच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

ही एक दुर्दैवी घटना घडली असून आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, असे हॉटेलचे व्यवस्थापन करणाऱ्या इंडियन हॉटेल कंपनीने एका निवेदनाद्वारे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -