घरताज्या घडामोडीNTA Recruitment: स्टेनोग्राफर आणि इतर पदांसाठी भरणार इतक्या जागा

NTA Recruitment: स्टेनोग्राफर आणि इतर पदांसाठी भरणार इतक्या जागा

Subscribe

NTAच्या अधिकृत साइटवर जाऊन उमेदवारांना हा अर्ज भरता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ( National Testing Agency) स्टेनोग्राफर आणि इतर काही पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आणली आहे. या नोकर भरतीत एकूण ५८ पद भरती करण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत. NTAच्या अधिकृत साइटवर जाऊन उमेदवारांना हा अर्ज भरता येणार आहे. कोणत्याही प्रकारचा कागदी अर्ज या भरतीत स्वीकारला जाणार नाही. १८ जानेवारी २०२१ ते १८ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. NTA पदांची निवड करताना उमेदवाराची गुणवत्ता आणि कामाच्या अनुभवावरून केली जाणार आहे.

अर्ज शुल्क

यूआर/ ओबीसी आणि ईडब्ल्यू प्रवर्ग आणि एससी/ एसटी आणि पीडब्ल्यू प्रवर्गासाठी ८०० रूपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत. याबाबतची अधिक माहिती NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://www.nta.ac.in/Download/Notice/Notice_20210118121244.pdf

- Advertisement -

कोणत्या पदासाठी किती जागा?

NTA च्या उमेदवारी अर्जात एकूण ५८ पदे भरण्यात येणार आहेत. यात उपसंचालक पदासाठी एकूण ४ पदे देण्यात आली आहेत. सहाय्यक संचालकासाठी ३ पदे,वरिष्ठ प्रोग्रामरसाठी २ तर प्रोग्रामरसाठी ३ पोस्ट ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ६ पदे भरण्यात येणार आहे. तर स्टेनोग्राफरसाठी ९ जागा भरण्यात येणार आहेत. सिनीअर असिस्टंटसाठी ६ पदे तर ज्युनिअर सहाय्यक पदासाठी ३ जागा भरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सिनिअर टेक्निशिअनसाठी ३ पदे भरण्यात येणार आहेत. तर ज्युनिअर टेक्निशिअनसाठी ५ पदे भरण्यात येणार आहेत.


हेही वाचा – केंद्राच्या टांकसाळमध्ये नोकरीची संधी; पदवी,आयटीवाल्यांना प्राधान्य

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -