Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर CORONA UPDATE कोरोनाच्या लसीची प्रत्येक बाधिताला गरज नाही – तज्ज्ञांचा दावा

कोरोनाच्या लसीची प्रत्येक बाधिताला गरज नाही – तज्ज्ञांचा दावा

कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत.

Mumbai
लस
लस

जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना संसर्गावर लस विकसित करण्यासाठी अनेक देशात प्रयत्न सुरू आहे. सगळ्यांचेच लक्ष या कोरोनाच्या लसीवर आहे. मात्र कोरोनाच्या लसीवर आवश्यकता सर्वांनाच लागणार नसल्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका सुनेत्रा गुप्ता यांनी म्हटले आहे.

जगभरात कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसिक करण्यात येत आहे. यामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कोरोना लसीची आवश्यकता सर्वांनाच भासणार नसल्याचे म्हटले आहे. प्रा. गुप्ता यांनी म्हटले की, सामान्य, निरोगी आणि जे वयस्कर नाहीत, सशक्त असलेल्या नागरिकांना कोरोना लसीची आवश्यकता भासणार नाही. त्यांच्यासाठी कोरोना हा एखाद्या तापाप्रमाणेच असेल. मात्र वयस्कर एकहून अधिक आजरांशी लढत असलेल्या नागरिकांना कोरोना लसी आवश्यकता भासू शकते. या लसीमुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल असेही त्यांनी सांगितले.

१५ ऑगस्टपर्यंत लस येण्याची शक्यता

कोरोनाच्या या वाढत्या संकटात एक दिलासादायक बातमी समोर आली. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे. मात्र ही लस कधी लाँच होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. कारण १५ ऑगस्ट रोजी ही लस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात कोरोनावर लस तयार झाली असून ही लस भारत बायोटेकने तयार केली आहे. तर भारत बायोटेक व आयसीएमआर तर्फे या लसीचे लाँचिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही लस लाँच झाल्यानंतर लगेच या लसीचा वापर कोरोना रूग्णांच्या उपचारादरम्यान होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही लस औषध १५ ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध करू देऊ, असं आयसीएमआरनं एका पत्रातून म्हटलं होतं.


हे ही वाचा – तज्ज्ञ म्हणतात, १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस येणं निव्वळ अशक्यच!