घरट्रेंडिंगनिर्दयी! पर्यटकांच्या सेल्फीसाठी बछड्याचे पायच तोडले!

निर्दयी! पर्यटकांच्या सेल्फीसाठी बछड्याचे पायच तोडले!

Subscribe

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला स्फोटकं खायला दिल्यानंतर, कुत्र्याच्या तोंडाला घट्ट टेप बांधणे, गायीला फटाके खायला देणं अशा घटना एकामागून एक पुढे येत आहेत. त्यानंतर आता अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना फोटो काढण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी एका सिंहाच्या छाव्याचे पाय तोडले आहेत. अमानवीय घटनेची राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीदेखील दखल घेतली असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी आणि फोटो काढताना छावा पळून जाऊ नये म्हणून बछड्याचे दोन पाय तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बछड्याचे नाव सिंम्बा असे आहे. या बछड्याला दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्यानं त्याला उठता येत नाही. पर्यटक या बछड्याशेजारी येऊन मनसोक्त सेल्फी काढू शकतात या उद्देशानं हे निर्दयी कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- Advertisement -

सिंबाच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून आणि त्याला अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले असल्याचे या छाव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या युलिया अगिवा यांनी दिली. अनेकदा वन्य प्राण्यांची हाडे मोडली जातात. जेणेकरून हे पर्यटकांना पाहून पळून जाता कामा नये. या बछड्याला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं. सिंबासोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पुतीन यांनी दिलं आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीचे आदेशही दिले आहेत.


हे ही वाचा – ब्रेन सर्जरी सुरू असतानाच रूग्णाला जाग आली, लागला भजी तळायला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -