घरदेश-विदेशपोलीस कॉन्स्टेबलची ऑन-ड्युटी असताना केली हत्या

पोलीस कॉन्स्टेबलची ऑन-ड्युटी असताना केली हत्या

Subscribe

पोलीस कॉन्स्टेबल एका प्रकरणाच्या चौकशीकरिता घटनास्थळी गेले असता अज्ञातांकडून मारहाण

राजस्थानमध्ये असणाऱ्या राजसमंदमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजसमंदमध्ये आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलला अज्ञातांनी मारहाण केली. या मारहाणीत त्या कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वयवर्ष फक्त ४५ असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव अब्दुल गनी असे असून भीम पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते.

हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार

अब्दुल गनी हे शनिवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका प्रकरणाच्या चौकशीकरिता घटनास्थळी गेले असता, या ठिकाणी काही अज्ञात लोकांनी अचानक जमा होऊन त्यांच्यावर लोखंडी सळई आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. हा हल्ला केल्यानंतर ते हल्लेखोर तेथून फरार झाले.

- Advertisement -

कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान मृत्यू

तेथील गावकऱ्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत गनी यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी हल्लेखोर नक्की कोण होते? त्यांची नावे अद्याप समोर आली नाहीत, असेही पोलिसांनी सांगितले.

जनतेचे रक्षण करणारे पोलीसच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न या प्रकारानंतर आता उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -