घरदेश-विदेशतामिळनाडूच्या गंगाई अम्मन मंदिराजवळ स्फोट; १ ठार, ४ जखमी

तामिळनाडूच्या गंगाई अम्मन मंदिराजवळ स्फोट; १ ठार, ४ जखमी

Subscribe

मंदिराशेजारी स्फोट झाल्याचे समजताच बॉम्ब पथक घटनास्थळी रवाना

तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील गंगाई अम्मन मंदिरा जवळ अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये एक व्यक्ती जागीच ठार झाला असून ४ लोक गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

मंदिराजवळ पाच संशयित माणसं फिरत होते. त्याच्या हातात एक बॉक्स होता. त्यांनी तो बॉक्स उघडताच हा स्फोट घडल्याचे तेथील एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले. या प्रकरणाची तपासणी सुरू असून या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्य़ांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच, मंदिराशेजारी स्फोट झाल्याचे समजताच बॉम्ब पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नमुने जप्त केले असुन तो आयईडी स्फोट होता की नाही याची चाचणी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -