Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग पहिली नंतर दुसरी आवडली, पठ्ठ्याने दोघींसोबत वरात काढली! 

पहिली नंतर दुसरी आवडली, पठ्ठ्याने दोघींसोबत वरात काढली! 

छत्तीसगडमधील या अजब घटनेत एका मुलाने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न केले. 

Related Story

- Advertisement -

एका वराने दोन वधूंसोबत लगीन गाठ बांधल्याचे, तेही एकाच मांडवात, तुम्ही कधी ऐकले आहे का? छत्तीसगडमध्ये असा प्रकार फक्त ऐकायला नाही, तर पाहायला मिळाला आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अशा भन्नाट गोष्टी लपून राहणे शक्यच नाही. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वर एकाच वेळी दोन वधूंसोबत ‘सात फेरे’ घेताना दिसत आहे.

छत्तीसगडमधील या अजब घटनेत एका मुलाने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न केले. चंदू मौर्य असे या नवरदेवाचे नाव असून दोन्ही तरुणींनी परस्पर संमतीने चंदूशी लग्न केले. शेती व्यवसाय करणारा चंदू एका वर्षापूर्वी सुंदरी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्याने तिला आपल्या घरी आणले. मात्र, एका महिन्यानंतरच त्याला हसीना नावाची दुसरी मुलगी आवडू लागली. त्याने तिलाही घरी आणले आणि हे तिघे एकत्र राहू लागले.

- Advertisement -

तिघेही अगदी आनंदाने एकमेकांसोबत राहत होते. म्हणूनच जवळपास वर्षभर एकत्र राहिल्यानंतर तिघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी लग्नाचा हा निर्णय आनंदाने स्वीकारला. अखेर ३ जानेवारीला या तिघांचा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला ६०० लोकांनी हजेरी लावली.

- Advertisement -