घरदेश-विदेशदिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनवर अंगावर अॅसिड पडून ६ जण जखमी एकाचा मृत्यू

दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनवर अंगावर अॅसिड पडून ६ जण जखमी एकाचा मृत्यू

Subscribe

दिल्लीमध्ये बांधकाम सुरु असलेल्या मेट्रो स्टेशनवर अॅसिडचे कॅन पडून ६ जण जखमी झाले आहेत. तर उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.

दिल्लीमध्ये एका मेट्रो स्टेशनवर बुधवारी रात्री काम सुरु असताना एक दुर्देवी घटना घडली. दिल्लीतील पिंक लाईनजवळील शिव विहार मेट्रो स्टेशनवर अॅसिडचा कॅन पडल्याने ६ जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. सर्व जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

गाझियाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शिव विहार मेट्रो स्टेशन हे दिल्ली मेट्रोच्या पिंक लाइन परिसरातील एक बांधकाम सुरु असलेले स्टेशन आहे. दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत हे स्टेशन तयार होत आहे. शिव विहार मेट्रो स्टेशन गाझियाबादच्या बॉर्डरवर आहे. या घटनेनंतर गाझियाबाद पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे.

उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू

अजून पर्यंत ही माहिती नाही मिळाली की, अॅसिडचे बॉक्स या ठिकाणी कसे आले आणि ते लोकांच्या अंगावर कसे पडले. जवळच मेट्रो स्टेशनचे काम सुरु असल्यामुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती नाजूक आहे. तर उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -