घरदेश-विदेशविरोधी पक्षांकडून पुन्हा ‘ईव्हीएम’ राग

विरोधी पक्षांकडून पुन्हा ‘ईव्हीएम’ राग

Subscribe

एक्झिट पोलनंतरच कवित्व

बहुतेक सर्वच एक्झिट पोलने एनडीएला बहुमत मिळणार अशी भविष्यवाणी केल्यानंतर विरोधी पक्षांकडून आता ईव्हीएम मशिनविरोधात आवाज उठायला सुरुवात झाली आहे. ईव्हीएम मशिनसोबत छेडछाडची शंका व्यक्त करताना काही विरोधी पक्षांनी, व्हीव्हीपॅट काऊंट आणि ईव्हीएम मशिनमधील मते वेगवेगळी असतील तर काय होईल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ही मते वेगवेगळी असतील तर संपूर्ण लोकसभा निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेत अनेक समस्यांचा उल्लेख करत त्या समस्या निवडणूक आयोगाने दूर कराव्यात अशी मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षांनी एक्झिट पोललाही ईव्हीएमसोबत छेडाछाडीसाठी ढालीप्रमाणे वापरण्याचा उल्लेख केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ईव्हीएमबद्दल प्रथम आक्षेप घेतला. एक्झिट पोलचे निकाल येण्याअगोदरच राहुल गांधी यांनी ट्विट करून निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ईव्हीएमशी छेडछाड, त्यांना हवे तसे निवडणूक वेळापत्रक, इलेक्ट्रोलर बॉण्ड या माध्यामातून निवडणूक आयोगाने अगोदरच मोदींपुढे आत्मसमर्पण केेले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्याशिवाय डीएमकेचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, सीपीएमचे महासचिव सिताराम येच्युरी, ममता बॅनर्जी, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीही ईव्हीएमवर दोषारोपण करणे सुरू केले आहे.

- Advertisement -

शहांची डिनर डिप्लोमसी
बहुतेक सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार, असल्याचा अंदाज व्यक्त झाल्यामुळे भाजपने आपली रणनिती ठरवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुढील रणनिती ठरवण्यासाठी निकालाआधी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. एनडीएच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतर उद्भवणार्‍या संभाव्य स्थितीवर चर्चा होणार असून यानिमित्ताने शहा यांच्याकडून सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांसाठी खास डीनरचाही बेत आखला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पवारांची धावपळ
लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे संपले नसताच दिल्लीत राजकीय हालचालींना जोर आला होता. चंद्राबाबू नायडू यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली होती. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर त्या थांबतील असे वाटत असताना उलट त्यात वाढ झाल्याचे दिसून आले. नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसोबत रविवारी दोन तास चर्चा केली. या चर्चेत पवारांवर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची महागठबंधनमध्ये येण्यासाठी मनधरणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शरद पवारांची चांगली धावपळ सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -