घरदेश-विदेशउद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोठी बैठक; सोनिया-पवारांसह १८ पक्षांच्या नेत्यांचा सहभाग 

उद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोठी बैठक; सोनिया-पवारांसह १८ पक्षांच्या नेत्यांचा सहभाग 

Subscribe

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी तीन वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बैठक होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी नेत्यांची एक मोठी बैठक शुक्रवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, द्रमुक नेते एमके स्टालिन यांच्यासह १८ राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षाची ही बैठक कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या बैठकीला गुलाम नबी आझाद आणि एके अँटनी हेदेखील कॉंग्रेसच्या बाजूने या बैठकीत भाग घेतील. तृणमूल कॉंग्रेसच्या वतीने डेरेक ओ ब्रायनदेखील या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. मात्र, ममता बॅनर्जी या बैठकीला उशिरा हजर राहतील. ममता बॅनर्जी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बंगालमधील वादळ बाधित भागात हवाई सर्वेक्षण करणार आहेत. या बैठकीत मोदी सरकारने कोरोना आणि लॉकडाऊन संदर्भात उचललेल्या पावलांवर चर्चा होईल. तसंच केंद्र सरकारचं राज्य सरकारांसोबतचं वर्तन याविषयी चर्चा करण्यात येणार आहे असं म्हटलं जातंय.

- Advertisement -

या बैठकीत राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) अध्यक्ष अजित सिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सीताराम येचुरी हे नेतेही या बैठकीत असतील. या व्यतिरिक्त जनता दल (सेक्युलर) मधील एचडी देवेगौडा आणि जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षातून फारूक अब्दुल्ला किंवा ओमर अब्दुल्ला सामील होऊ शकतात. तथापि, आम आदमी पार्टीमधील कोणीही या बैठकीत सहभागी होणार नाही. ‘आप’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या सभेसाठी आमंत्रण मिळालेलं नाही.

विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप करत म्हटलं होतं की अशा वेळी केंद्राने राजकारण करू नये. त्या म्हणाल्या की कोरोनाविरूद्धच्या लढ्यात राज्य चांगलं काम करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उद्यापासून स्टेशनच्या काउंटरवरही करता येणार तिकिट बुकिंग


यापूर्वी २६ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. आम्ही केंद्राकडून डाळ मागितली आहे, कारण आम्ही आपल्या राज्यात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लोकांना धान्य देतो, पण आमच्याकडे फक्त तांदूळ आहे. म्हणूनच आम्ही डाळ आणि गहू मागितला. मात्र आम्हाला अद्याप यातलं काहिच मिळालेलं नाही. मला वाटतं की “दाल में कुछ काला है लेकिन दाल तो आने दो” असा टोला लगावला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -