घरदेश-विदेशकृषी विधेयकाला विरोध कायम; इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून केले आंदोलन

कृषी विधेयकाला विरोध कायम; इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून केले आंदोलन

Subscribe

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरुन देशात रणकंदान सुरू झाले आहेत. शेतकरी संतप्त झाले असून जागोजागी आंदोलने सुरू आहेत. त्यातच या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आज, सोमवारी सकाळी नवी दिल्लीतील इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून आंदोलकांनी घोषणाबाजी केली. राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना पंजाब युवक काँग्रेसच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. सकाळी सात वाजून ४२ मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

या घटनेप्रकरणी नवी दिल्लीचे डीसीपी यांनी माहिती दिली की, इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून तपास सुरु आहे. आठवड्याभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर काल, रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, आज शहीद भगत सिंह यांची जयंती असून शेतकऱ्यांनी त्यांच्या नावाची घोषणाबाजी करत आंदोलन केले.

हेही वाचा –

जम्मू-काश्मीर: पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाचे २ दहशतवादी ठार; एक जवान जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -