पॉर्न व्हिडिओमधून साथीदारांशी गुप्त संवाद साधायचा, ओसामा बिन लादेन!

लादेन स्वतः जवळ मोठ्या प्रमाणात अश्लील चित्रपट आणि इरोटिक फोटो बाळगायचा.

ओसामा बिन लादेन

अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन आपल्या अतिरेकी दहशतवाद्यांशी अश्लील, पॉर्न व्हिडिओमध्ये असलेल्या विशिष्ट संदेशांद्वारे संवाद साधत असे. नॅशनल जिओग्राफिकच्या एका नवीन डॉक्युमेंटरी शोमध्ये लादेन जवळ असलेल्या डिजिटल आणि लिखित साहित्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. असे सांगितले जाते की, अमेरिकन नेव्ही सीलने त्याच्या घरातून ही सामग्री जप्त केली आहे. बिन लादेनची हार्ड ड्राइव्ह असे या माहितीपटाचे नाव आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार पीटर बर्गन यांनी शोमध्ये लादेनच्या ताब्यात घेतलेल्या साहित्याची तपासणी केली असून प्रत्यक्षात संवाद साधण्यासाठी लादेनची ही साधने होती की नव्हती याचा शोध घेतला गेला. लादेनच्या पत्रांनुसार त्याला ईमेल वापरण्याची भीती वाटत होती. तर तो कूरियरद्वारे बहुतेक बाहेरच्या जगात संवाद साधत असायचा. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये २०११ मध्ये मारण्यात आले होते. अमेरिकन नेव्ही सीलच्या कारवाई दरम्यान, हे उघडकीस आले आहे की, लादेन स्वतः जवळ मोठ्या प्रमाणात अश्लील चित्रपट आणि इरोटिक फोटो बाळगायचा. बिन लादेनची हार्ड ड्राइव्ह (Bin Laden’s Hard Drive) माहितीपट सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक पीटर बर्गन यांनी सादर केला आहे. टीव्हीवर लादेनची मुलाखत घेणारा तो पहिला पाश्चात्य पत्रकार असल्याचे सांगितले जात आहे.

‘बिन लादेनची हार्ड ड्राइव्ह’ शोमध्ये, अशी कल्पना आहे की, कदाचित लादेन आपल्या लोकांशी पॉर्न मूव्हीजमध्ये कोडेड मेसेजद्वारे संपर्क साधत असे. दरम्यान, सीआयएचे तज्ज्ञ रीड मेलॉय यांनी असे सांगितले की, कदाचित असेही होऊ शकते की लादेन सामान्य माणसाप्रमाणे स्वतःच्या आनंदासाठी अशी अश्लील सामग्री वापरत असावा.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या ऐबोटाबाद येथील ज्या कंपाऊंडमध्ये लादेनला ठार मारण्यात आले होते तेथे इंटरनेट कनेक्शन नव्हते किंवा संगणकही नव्हते. पण तिथे बरेच टीव्ही सेट सापडले. तो त्या घरात इतर २२ लोकांसह राहत होता. म्हणूनच हे अश्लील चित्रपट त्यांनी स्वत: संग्रहित केले किंवा वापरले होते हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकत नाही. २०१७ मध्ये सीआयएने लादेनच्या असणाऱ्या स्वभावामुळे हे साहित्य सोडणार नसल्याचे सांगितले आहे.


PUBG Ban : पब्जी खेळायला मिळत नाही म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या