महाविद्यालयाबाहेर कुत्र्यांची १५ पिल्ले मृतावस्थेत

कोलकाता येथील एका महाविद्यालयाच्या आवारात कुत्र्यांची १५ पिल्ले मृतावस्थेत आढळली आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशीस सुरुवात केली आहे.

Kolkata
puppies
प्रातिनिधिक फोटो

जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच चीड देईल. कोलकाता येथील एका महाविद्यालयाच्या आवारात तीन बॅगेत कुत्र्याच्या पिल्लांचे मृतदेह सापडले आहे. या बॅगांमधून १५ ते १७ पिल्ले हस्तगत करण्यात आली आहे. कोलकात्यातील एनआरएस मेडिकल महाविद्यालयाच्या आवारात ही घटना घडली. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. या पिल्लांबरोबर दोन मोठ्या कुत्र्यांचेही मृतदेह आढळले. या कुत्र्यांच्या मृतदेहातून रक्तस्त्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. हे मृतदेह आढळले तेव्हा दोन पिल्ले जिवंत होती मात्र त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलीसात तक्रार दाखल

येथील स्थानिक नागरिकांनी या बॅगांबद्दल माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या बॅगा ताब्यात घेतल्या. या मृतदेहांना रुग्णालयात शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेत गुन्हा नोंदवला आहे. परिसरात लावलेल्या सीसीटीवीच्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. या परिसरातील काही प्राणीप्रेमींनी शवविच्छेदनाची मागणी केली होती. कुत्र्यांना मारहाण करून त्यांना विष दिल्याचा संक्षय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुपारी ३.१५ मिनिटांनी येथील स्थानिकांना या बॅग आढळल्या असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here