स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी

शनिवारी केवाडियाच्या सरदार सरोवर काठाशेजारी असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी केली. २७ हजार पर्यटकांनी शनिवारी हा पुतळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Statue of Unity to get Rail and road connectivity
जगातील सर्वात उंच आणि भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आत्ता रेल्वे रूळ आणि विमानतळ येणार आहे.

गुजरातमधील केवाडिया येथे तयार करण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचे अनावरण ३१ ऑक्टोबरला करण्यात आले. १ नोव्हेंबरपासून हा पुतळा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. या शनिवारी केवाडियाच्या सरदार सरोवर काठाशेजारी असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी झालेली पाहायला मिळाली. २७ हजार पर्यटकांनी शनिवारी हा पुतळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. १८२ मीटर उंची असलेला हा पुतळा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय होता. आता तर हा पुतळा गुजरातमध्येच नाही तर भारतातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

सोमवार मेन्टेनन्ससाठी बंद

दर सोमवारी हा पुतळा मेन्टेनन्सच्या कामासाठी पर्यटक पाहू शकणार नाहीत. त्यामुळे केवळ मंगळवार ते रविवार हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा पाहण्यासाठी लिफ्टचीदेखील सोय करण्यात आलेली आहे. दोन लिफ्ट येथे असून साधारण ५ हजार पर्यटक एका दिवसामधून यातून येऊ – जाऊ शकतात. तसेच पुतळ्याजवळील भाग पाहण्यासाठीदेखील येथे सोय करण्यात आलेली असल्यामुळे सध्या हे ठिकाण पर्यटकांसाठी खास ठरले आहे. अगदी लांबूनदेखील केवळ स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी शनिवारी पर्यटक आल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर खास पर्यटकांना पाहण्यासाठी इथे फुलांची बाग, संग्रहालय, सरदार सरोवर, स्मारक आणि राहण्यासाठी टेन्ट हाऊसचीदेखील सोय करण्यात आलेली नाही. तसेच सेल्फी लव्हर्ससाठी एक सेल्फी पॉईंटदेखील तयार करण्यात आलेला आहे. दरम्यान हा पुतळा पाहण्यासाठी ३०० रुपयेदेखील आकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असून शनिवारी रेकॉर्डब्रेक २७ हजार पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.