घरदेश-विदेशतांत्रिकी अज्ञानामुळे ८० टक्के इंजिनीअर बेरोजगार

तांत्रिकी अज्ञानामुळे ८० टक्के इंजिनीअर बेरोजगार

Subscribe

अभियांत्रीकी विभागात मिळाणऱ्या शिक्षणानंतरही ८० टक्के विद्यार्थी बेरोजगार असल्याची माहिती अहवालावरुन समोर आली आहे. तांत्रिकी अज्ञान हे बेरोजगारीचे मोठे कारण आहे.

देशात दरवर्षी लाखे इंजिनीअर्स अभियांत्रीकी शिक्षण घेऊन पास होतात. मागील काही वर्षांपासून अभियांत्रीकी विभागात शिक्षण घेण्यासाठी मुलांचे पालक जोर देतात. मुलाचे शिक्षण अभियांत्रीकी विभागात व्हावे म्हणून मुलांना अनेकदा शिक्षणाची सक्ती केली जाते. चांगल्या काॅलेजमधून शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी मिळत नसल्याचे आपण ‘थ्री इडियट’ चित्रपट चित्रपटात बघितले. अभियांत्रीकी विभागाचे शिक्षण मिळवण्यासाठी चांगले कॉलेज आवश्यक असते आणि चांगले कॉलेज मिळवण्यासाठी चांगल्या मार्कांची आवश्यकता असते. मात्र सर्वच अभियांत्रीकी विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळणे शक्य नसते. यामुळे मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जातो. देशातील अशाच कॉलेजेसमधून बाहेर पडणारी ८० टक्के इंजिनीअर बेकार असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

अहवालातील माहिती 

  • देशातील ३.८४ टक्के इंजिनीअर्सला सॉफ्टवेअर क्षेत्रातील स्टार्टअप कंपनींमध्ये नोकरी मिळते
  • फक्त ३ टक्के विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती असते
  • फक्त १.७ टक्के विद्यार्थ्यांना कामाबद्दल माहिती किंवा अनुभव असतो
  • भारतीय इंजिनीअर मधूल ४० टक्के मुले नोकरीला लागण्यापूर्वी एकदा इंटर्नशिप करतात
  • सात टक्के विद्यार्थी अनेक कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतात
  • तांत्रिकी अज्ञानामुळे ३६ टक्के इंजिनीअर्सला कंपनीच्या प्रोजेक्टबद्दल माहिती नसते त्यामुळे ते काम करण्यास योग्य नसतात
  •  देशात ८० टक्के इंजिनीअर सध्या बेरोजगार आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -