घरदेश-विदेशओमानहून ५० हजारांपेक्षा जास्त भारतीयांची घरवापसी! १५ ऑगस्टपर्यंत आणखी १९ उड्डाणं

ओमानहून ५० हजारांपेक्षा जास्त भारतीयांची घरवापसी! १५ ऑगस्टपर्यंत आणखी १९ उड्डाणं

Subscribe

येत्या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत पाचवा टप्पा सुरू करण्याची भारत सरकारची योजना

कोरोना महामारी दरम्यान ५० हजारांहून अधिक भारतीयांना गेल्या तीन महिन्यांतील काळानंतर सुखरूप स्वदेशात घरी आणण्यात आले. दरम्यान, टाइम्स ऑफ ओमानने मस्कत मधील भारतीय दूतावासाचा हवाला देत असे म्हटले आहे की, सामाजिक संस्था आणि कंपन्यांनी १९८ चार्टर्ड विमान बुक केले असून कोरोना रूग्णांच्या वाढत्या संकट काळात मे महिन्यात ३५ हजार भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे.

यासह, भारत सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत ९७ उड्डाणांच्या माध्यमातून १७ हजार भारतीयांना भारतात आणण्यात आले. ओमानमधील भारतीय दूतावासाचे दुसरे सचिव अनुज स्वरूप यांनी सांगितले की, वंदे भारत मिशन ९ मे पासून येथे सुरू करण्यात आले होते आणि आतापर्यंत १०५ उड्डाणे चालविण्यात आल्या आहेत. यासह स्वरूप यांनी सांगितले की, येत्या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत पाचवा टप्पा सुरू करण्याची भारत सरकारची योजना आहे. त्याअंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत देशातील वेगवेगळ्या राज्यांसाठी १९ उड्डाणे चालविली जाणार आहेत.

- Advertisement -

ओमानमध्ये आतापर्यंत ७९ हजार १५९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४२२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना सारख्या साथीच्या आजारामुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला असून त्यामुळे बरेच लोक बेरोजगार देखील झाले आहेत.

तर देशात गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५२ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ८०३ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३८ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १८ लाख ५५ हजार ७४६ झाली आहे तर सध्या ५ लाख ८६ हजार २९८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तसेच १२ लाख ३० हजार ५१० कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केली असून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३८ हजार ९३८ जणांचा मृत्यूही झाला.


WHO चा इशारा! कोरोनावरील इलाज लवकर मिळणे अशक्य; सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -