घरताज्या घडामोडीवंदे भारत मिशन अंतर्गत १ लाखाहून अधिक परदेशात अडकलेले भारतीय परतले स्वदेशी

वंदे भारत मिशन अंतर्गत १ लाखाहून अधिक परदेशात अडकलेले भारतीय परतले स्वदेशी

Subscribe

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगातील अनेक देशांमध्ये लाखो भारतीय अडकलेले आहेत. त्यांना स्वदेशी परत आणण्यासाठी आतापर्यंतचे सर्वांत मोठे अभियान म्हणजे वंदे भारत मिशन राबवण्यात आले. १३ जूनला या अभियानाचा दुसरा टप्पा संपणार असून तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. यासाठी एअर इंडिया आणि त्याची सहाय्यक कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा वापर केला जात आहे. नौदल देखील यामध्ये सहाकार्य करत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, या अभियानाच्या दुसऱ्या टप्पात ३१ देशांमध्ये अडकलेले जवळपास ३८ हजार लोकांना ३३७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेऊन देशात परत आणण्याची योजना आहे.

- Advertisement -

वंदे भारत मिशनचा पहिला टप्पा ७ मे रोजी सुरू झाला आणि तो १५ मे पर्यंत होता. पहिल्या टप्प्यात १२ देशांमधून जवळपास १५ हजार भारतीयांना स्वदेशी आणले गेले. त्यानंतर १७ मे पासून दुसरा टप्प्याला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्याचा काळ १७ मे ते २२ मेपर्यंत केला होता. पण तो आता १३ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

श्रीवास्तव म्हणाले की, मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात एअर इंडियाने आतापर्यंत १०३ विमान उड्डाणे झाली आहेत. तसेच नौदलाने श्रीलंका आणि मालदीवमधील अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्याचेही काम केले आहे.

- Advertisement -

मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, वंदे भारत मिशनच्या सुरुवातीपासून म्हणजे ७ मे पासून ते आतापर्यंत ४५३ विमान उड्डाणे झाली. यामध्ये परदेशातील विमानांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत एक लाख सात हजार १२३ भारतीयांना स्वदेशी आणले गेले आहे.

भारतात परत येणाऱ्यांमध्ये १७ हजार ४८५ प्रवासी मजूर आहेत, ११ हजार ५११ विद्यार्थी आणि पाच हजार ६३३ व्यावसायिक आहेत. श्रीवास्तव यांनी सांगितले की, परदेशात अडकलेल्या एकूण तीन लाख ४८ हजार ५६४ अर्ज भारतीयांचे स्वदेशी येण्यासाठी आले आहेत.


हेही वाचा – युवराज सिंग विरोधात एफआयआर दाखल, चहलसाठी जातीवाचक शब्दाचा केला वापर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -