घरदेश-विदेशCoronavirus: भारतात ऑक्सफोर्ड निर्मित लसीचे उत्पादन सुरू, कोट्यवधी डोस तयार करणार

Coronavirus: भारतात ऑक्सफोर्ड निर्मित लसीचे उत्पादन सुरू, कोट्यवधी डोस तयार करणार

Subscribe

ब्रिटनची औषधी कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका याबाबतची माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. मात्र, जगभरात संशोधन सुरु आहे. दरम्यान, ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस पहिल्या चाचणीत यशस्वी झाली आहे. आता ही लस दुसऱ्या टप्प्यात आहे. या लसीचे उत्पादन आता भारतात देखील सुरु होणार आहे. याबाबतची माहिती ब्रिटनची औषध कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने दिली. ब्रिटनची औषधी कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका म्हणाली आहे की त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीच्या कोट्यावधी डोसची निर्मिती सुरू केली आहे. या लसीचे उत्पादन ब्रिटन, स्वित्झर्लंड, नॉर्वे तसेच भारतात केलं जात असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने AZD1222 नावाची कोरोना लस विकसित केली आहे. चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप सुरू आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचे सीईओ पास्कल सोरियट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की आम्ही लस तयार करण्यास सुरवात करीत आहोत. निकालाच्या वेळी आमच्याकडे लस तयार असेल. तथापि, यामध्ये एक जोखीम देखील आहे. जर लस प्रभावी ठरली नाही तर सर्व मेहनत, पैसा व्यर्थ जाईल. यावर अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचे सीईओ पास्कल सोरियट म्हणाले की WHO जोपर्यंत कोरोना महामारी संपली असं जाहीर करत नाही, तोपर्यंत कंपनी नफा घेणार नाही.

- Advertisement -

पास्कल सोरियट म्हणाले की त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला असून कंपनी एक अब्ज लस डोस तयार करणार आहे. २०२१ पर्यंत एक अब्ज लस डोस तयार करण्याचं लक्ष्य आहे. त्याच बरोबर २०२०च्या अखेरीस ४० कोटी डोस तयार होऊ शकतात. सप्टेंबरपर्यंत जगभरातील फॅक्टरीत लाखो लस डोस तयार होतील. तर २०२१ च्या मध्यापर्यंत २ अब्ज डोस तयार होतील, असं ब्रिटनची कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने सांगितलं आहे.


हेही वाचा – ‘इडी’चे पाच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यालय केलं सील

- Advertisement -

ऑक्सफोर्ड विद्यापीठ ऑगस्टपर्यंत या लसीचा अंतिम निकाल जाहीर करू शकेल. सुरुवातीला AZD1222 लस १८ ते ५५ वर्षे वयोगटातील 160 निरोगी लोकांवर चाचणी केली गेली. यानंतर दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात, ऑक्सफोर्ड विद्यापीठात लसीच्या चाचणीत मुलांचा आणि वृद्धांचा देखील समावेश आहे. यावेळी, एकूण १० हजार २६० लोकांवर लसीची चाचणी घेण्यात येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -