घरCORONA UPDATEवाईट बातमी: ऑक्सफर्डने थांबवली कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी!

वाईट बातमी: ऑक्सफर्डने थांबवली कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी!

Subscribe

ज्या लसीची सगळे आतुरतेने वाट बघत अश्या कोरोनावरील लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची AZD1222 कोरोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यामुळे कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश- स्वीडिश कंपनी AstraZenca Plc ची ही लस संपूर्ण जगासाठी एक आनंदवार्ता देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भारताततही या लसीची चाचणी सुरू करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवेळी एका व्यक्तीला लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडली, काही दुष्परिणामही जाणवले. या व्यक्तीला रूग्णालयातही दाखल करावं लागलं. या व्यक्तीला नेमका काय त्रास होत आहे याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही

- Advertisement -

२०२१ च्या सुरूवातीला लस उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली होती. AstraZeneca Plc च्या प्रवक्त्यांनी लस दिलेल्या व्यक्तीच्या आजाराचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. चाचणीदरम्यान आजारी पडण्याची शक्यता असते, पण याची स्वतंत्रपणे काळजीपूर्वक माहिती घेणं गरजेचं असल्याचंही प्रवक्त्याने सांगितलं आहे. सोबतच वेगाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत माहिती घेण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी करोना लस फक्त यशस्वी होणार नाही तर सप्टेंबरमध्ये लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केली होता. ऑक्सफर्डच्या या लसीचं उत्पादन AstraZeneca करणार आहे.


हे ही वाचा – ‘ना घाबरणार, ना माघार घेणार’, मुंबईत येण्याआधी कंगनाचे ट्विट!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -