घरदेश-विदेशपी. चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण कोठडी कायम!

पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण कोठडी कायम!

Subscribe

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी सध्या कोठडीत असलेले पी. चिदंबरम यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

२१ ऑगस्टला अटक करण्यात आलेले देशाचे माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी त्यांना आधी सीबीआयने आणि नंतर ईडीने अटक केली होती. यासंदर्भात सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात जामीनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यासाठी कोर्टाने त्यांना अट देखील घालून दिली आहे. चिदंमबरम यांना परदेशात जाता येणार नाही. त्यासाठी त्यांना त्यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. तसेच, जेव्हा जेव्हा सीबीआयला आवश्यकता असेल, तेव्हा त्यांना चौकशीसाठी हजर व्हावं लागणार आहे. दरम्यान, चिदंमबरम यांना सीबीआयच्या अटकेमधून जामीन मिळाला असला, तरी ईडीच्या कोठडीत त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत राहावं लागणार आहे.


INX Media Case : या व्यवहारात चिदम्बरम दोषी कसे? – मनमोहन सिंग

- Advertisement -

२१ ऑगस्टला नाट्यमय घडामोडींनंतर चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आधी सीबीआयच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र, सीबीआयच्या कोठडीमध्ये असतानाच त्यांना ईडीने देखील अटक केली होती. त्यामुळी चिदंबरम दुहेरी कचाट्यात सापडले होते. दरम्यान, सीबीआयच्या अटकेविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीची कोठडी देखील सुनावली होती. त्यामुळे सीबीआयने जरी जामीन दिला असला, तर अजून २ दिवस त्यांना ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे.


वाचा तो हाय व्होल्टेज ड्रामा! – अखेर २७ तास अदृश्य असलेले चिदम्बरम पत्रकार परिषदेत प्रकटले, म्हणाले…!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -