घरदेश-विदेशअखेर २७ तास अदृश्य असलेले चिदम्बरम पत्रकार परिषदेत प्रकटले, म्हणाले...!

अखेर २७ तास अदृश्य असलेले चिदम्बरम पत्रकार परिषदेत प्रकटले, म्हणाले…!

Subscribe

आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदम्बरम यांना अटक होण्याची शक्यता असताना ते गायब असल्याच्या चर्चा एकीकडे होत असताना खुद्द चिदम्बरम यांनीच नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपण गायब नसल्याचं सांगितलं.

आयएनएक्सप्रकरणी पी चिदम्बरम यांची ईडीनं चौकशी केल्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला. या पार्श्वभूमीवर पी. चिदम्बरम यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या २७ तासांमध्ये माझ्यावर कायद्यापासून पळ काढून लपल्याचे आरोप केले गेले. मात्र, या २७ तासांमध्ये मी माझ्या वकिलांच्या टीमसोबत कायद्यासमोर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यामुळे या आरोपांचं मला आश्चर्य वाटतं असं यावेळी पी. चिदम्बरम यांनी म्हटलं आहे. तसेच, येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात मी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत कायद्यासमोर न्याय मिळेल, अशी आशा आपण ठेऊयात, असं देखील चिदम्बरम यावेळी म्हणाले.

मंगळवारपासून चिदम्बरम होते गायब!

उच्च न्यायालयाने मंगळवारी चिदम्बरम यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. या पार्श्वभूमीवर चिदम्बरम यांना कधीही अटक होऊ शकते अशी अटकळ बांधली जात होती. त्यासाठी ईडी आणि सीबीआयचं पथक देखील त्यांच्या घरी जाऊन आलं होतं. मात्र, त्यांना अटक झाली नव्हती. तसेच, चिदम्बरम स्वत: देखील गायब असल्याचं बोललं जात होतं. मात्र, ‘गेल्या २७ तासांपासून मी माझ्या वकिलांच्या टीमसोबत बसून सर्वोच्च न्यायालयात करायच्या अपीलासंदर्भात काम करत होतो. न्याय मिळवण्यासाठी काम करत होतो आणि मीच फरार झाल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे मला आश्चर्य वाटतंय’, असं देखील चिदम्बरम यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘चार्जशीटही नसताना आरोपी ठरवलं’

दरम्यान, यावेळी बोलताना चिदम्बरम यांनी न्यायासाठी हाक दिली. ‘राज्यघटनेच्या २१व्या कलमाने भारतीयांना स्वातंत्र्याची हमी दिली आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला होता. मात्र, ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देखील आपल्याला संघर्ष करावा लागतो. खरंतर आयएनएस मीडियाच्या केसमध्ये मला कोणत्याही प्रकरणात आरोपी करण्यात आलेलं नाही. माझ्या कुटुंबियांपैकी देखील कुणी आरोपी नाही. सीबीआय किंवा कुणीही या प्रकरणी चार्जशीट दाखल केलेली नाही. एवढंच काय, साधी एफआयआर देखील नाही. तरी देखील यावर चर्चा केली गेली आणि मला आणि माझ्या मुलाला या प्रकरणामध्ये आरोपी ठरवले गेले’, असं देखील यावेळी चिदम्बरम म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -