डॉ. पी. के. मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे प्रधान सचिव

वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. पी. के. मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

New Mumbai
p k mishra
डॉ. पी. के. मिश्रा ( सौजन्य-एनडीटीव्ही)

वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. पी. के. मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. माजी प्रधान सचिव सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर पी. के. मिश्रा यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. पी. के. मिश्रा अर्थात प्रमोद कुमार मिश्रा हे नरेंद्र मोदींचे जुने सहकारी असून गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी मिश्रा यांच्यासोबत काम केले आहे.

कोणा आहेत पी. के. मिश्रा

मिश्रा हे १९७२ च्या गुजरात कॅडरचे प्रशासकीय अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गुजरातच्या कच्छ येथे आलेल्या भूकंपनंतर आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन कार्यक्रमात मिश्रा यांचे मोठे योगदान होते. मिश्रा यांनी या विषयावर पुस्तकसुद्धा लिहिले आहे. २०१४ साली पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पी. के. मिश्रा यांना पंतप्रधान कार्यलयात अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले होते.

माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचा निरोप समारंभ नुकताच पंतप्रधान निवास्थानी पार पडला यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी पी के मिश्रा आणि प्रधानमंत्री कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –

‘ॐ’ आणि ‘गाय’ शब्द ऐकताच काहींना करंट लागतो – पंतप्रधान