ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारच्या भावानं केला फोल्डेबल फोन लाँच

ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारचा भाऊ, रॉबर्टो एस्कोबारनं, 'एस्कोबार फोल्ड १' हा फोल्डेबल फोन लाँच केला.

New Delhi
एस्कोबार फोल्ड १
एस्कोबार फोल्ड १

पाब्लो एस्कोबार हे नाव ड्रग माफियांच्या दुनियेतलं एक गाजलेलं नाव आहे, कोलंबियातील ड्रग लॉर्ड म्हणून जाणला जायचा.  पाब्लो एस्कोबारचं ड्रग तस्करीचे किस्से प्रचंड गाजलेले असून त्यावर अनेक चित्रपट आणि सिरीज देखील बनवण्यात आले आहेत. पाब्लो एस्कोबरनं आपला साथी गुस्तावो गेविरिया, भाऊ रॉबर्टो एस्कोबार आणि इतर परिवारासह मेडेलीन कार्टेल नावाचा ड्रग्जचा व्यवसाय सुरू केला होता. पाब्लोचा भाऊ रॉबर्टो या व्यवसायाचं सह-संस्थापक असून व्यवसायाचं अकांऊट्स सांभाळायचा. मात्र रॉबर्टोनं या व्यवसायापासून लांब जाऊन एक वेगळा रस्ता निवडायचं ठरवलं. नुकताच रॉबर्टोनं ‘एस्कोबार फोल्ड १’ नावाचा फोल्डेबल फोन लॉंच केला आहे. अॅपलचे फोन लोकांना फसवतात आणि म्हणून त्याला टक्कर देण्याकरीता हा फोन रॉबर्टोनं लॉंच केला आहे.

पाब्लो एस्कोबारच्या भावानं लॉंच केल एस्कोबार फोल्ड १
पाब्लो एस्कोबारच्या भावानं लॉंच केल एस्कोबार फोल्ड १

काय वेगळं आहे एस्कोबार फोल्ड १ मध्ये?

फोल्डेबल म्हंटलं की लोकांच्या मनात प्रश्न येतो की फोन फोल्डेबल कसा? तर या फोनची ही खासियत आहे की हा फोन एक साधारण फोन म्हणून देखील वापरता येतो आणि एक टॅब म्हणून देखील वापरता येतो. या कंपनीकडून सुरूवातीला फक्त १ लाख फोन लॉंच केले जाणार आहेत. या फोनच्या बेसीक मॉडलची किंमत २५ हजार १०० रुपये असून त्यात १२८ जीबीचं स्टोरेज उपलब्ध करण्यात आलं आहे. तर ५१२ जीबी स्टोरेजचा मॉडल हा ३५ हजार ८०० रुपये आहे. हा फोन फक्त एस्कोबारच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे आणि याची शिपींग दुनियाभरात फ्री असणार आहे. रिटेलर आणि बाकी नेटवर्कला मध्ये घेऊन फोनची किंमत वाढवायची नसल्यामुळे एस्कोबारनं हा फोन त्याच्याच साईटवर विकण्याचा ठरवलं.

एस्कोबार फोल्डेबल फोन
एस्कोबार फोल्डेबल फोन

एस्कोबार फोल्ड १ हा फोन लॉंच करण्यामागचा रॉबर्टोचा मुख्ये उद्देश म्हणजे एपलला टक्कर देणं. या फोनचं सिस्टम Android Pie वर चालणारं असून त्यात ६ जीबी किंवा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी किंवा ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. त्यासोबत २५६ जीबीचं एक्सटेर्नल स्टोरेज देखील आहे. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड या फोनच्या तुलनेत एस्कोबार फोल्ड १ हा फारच स्वस्त आहे. तर २०२० च्या जानेवरीमध्ये एस्कोबार हा एपलच्या विरोधात कारवाई दाखल करणार आहे. एपलनं जो लोकांकडून बेकायदेशीर नफा करून घेतला आहे तो लोकांना परत मिळायला पाहिजे असं रोबर्टानं डिजिटल ट्रेंडला सांगितलं.


हेही वाचा: Video: संसदेत खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज