घरदेश-विदेशअबब! २० लाखाचं खरबूज!

अबब! २० लाखाचं खरबूज!

Subscribe

उन्हाळ्याच्या उकाड्यात रसरशीत खरबूज खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. खरबूज म्हटलं की, कित्येक लोकांचा जीव की प्राण! इतकं जिव्हाळ्याचं आणि आवडीचं हे फळ आहे. एका कलिंगडाची किंमत आपल्याकडे साधारणपणे ४०-५० रूपये किंवा फारतर फार १०० रूपये असेल. पण सध्या जपानच्या एका कलिंगड जोडीची किंमत भलतीच चर्चेत आहे. अर्थात, त्यामागे कारणही तसंच आहे. जपानच्या टोकियो शहरातील फळांच्या बाजारपेठेत दोन खरबूज चक्क २९ हजार ३०० डॉलर म्हणजेच तब्बल २० लाख रूपयांना विकले गेले आहेत.

जपानमध्ये दोन वर्षापुर्वीही असेच एक खरबूज विकले गेले होते. परंतु, यावर्षी विकले गेलेल्या खरबूजने त्याचाही रेकॉर्ड मोडला आहे. सध्या जपानमध्ये जितक्या किंमतीत हे फळ विकले जात आहे, तितक्याच किंमतीत आपण तिथे एक कार खरेदी करु शकतो.

- Advertisement -

खरबूज म्हणजे प्रतिष्ठा
जपानमध्ये काही प्रतिष्ठित लोक हंगामी फळांना प्रतिष्ठेचं प्रतिक मानतात. त्यात तर खरबूज फारच स्पेशल मानलं जाणारं फळ. यावर्षी जपानच्या उत्तर होक्काइडोतील साप्पोरो सेंट्रल होलसेल मार्केटमध्ये लिलावात ठेवलेल्या या खरबूजला तिथल्या स्थानिक फ्रूट पॅकिंग फर्मने बोली लावत त्याची खरेदी केली. या खरबूजचं उत्पादन जपानच्या युबरी या भागातून केलं गेलं आहे.

मित्र, नातेवाईकांना खरबूज भेट
जपानच्या बाजारपेठेतील एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, या वर्षी युबरीच्या खरबूजांचं उत्पादन चांगलं होत आहे. कारण मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तिथे चांगलं ऊन पडत आहे. जपानमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या फळाला लोक भेट म्हणून मित्रांना किंवा नातेवाईकांना देतात.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -