घरदेश-विदेशपाकिस्तानला अखेर कबूल करावंच लागलं.. 'काश्मीर भारताचाच भाग'!

पाकिस्तानला अखेर कबूल करावंच लागलं.. ‘काश्मीर भारताचाच भाग’!

Subscribe

जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग असल्याचं अप्रत्यक्षपणे पाकिस्तानने मान्य केलं आहे.

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर अखेर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मान्य केलं आहे की जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनीच तसा उल्लेख करत काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं मान्य केलं आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी यासंदर्भातलं केलेलं वक्तव्य काश्मीर भारताचाच भाग असल्याचं मान्य करणारं होतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच, अखेर पाकिस्तानने हे मान्य केल्याचं देखील बोललं जात आहे.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्रामध्ये बोलताना कुरैशी यांनी भारतावर नेहमीप्रमाणे अनेक आरोप केले. यावेळी पाकिस्तानकडून त्यांनी ११५ पानांचं डॉजिअर देखील सादर केलं. त्यामध्ये प्रामुख्याने काश्मीर मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमं किंवा स्वयंसेवी संस्थांना का प्रवेश दिला जात नाही?’ असा प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित केला. त्यावेळी काश्मीरचा उल्लेख भारताचा भाग म्हणून केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


हेही वाचा – भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानने मसूद अजहरला सोडलं?

- Advertisement -

कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी भारतविरोधी वक्तव्य करून दोन्ही देशांमधील वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. ‘युद्ध जिंकण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो’ असं वक्तव्य बाजवा यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीर कुरेशी यांनी काश्मीरबाबत केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -