घरदेश-विदेशपाकिस्तानची भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

पाकिस्तानची भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एका दर्पोक्ती केली असून यावेळी त्यांनी भारताला अप्रत्यक्षपणे अणुबॉम्ब हल्ल्याची धमकीच दिली आहे.

फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेशी संवाद साधताना काश्मीर मुद्द्यावर आण्विक युद्धाची भिती व्यक्त करत भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकीच दिली. त्याचप्रमाणे काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आम्ही यशस्वी झालो असून पुढील महिन्यात हा मुद्दा जागतिक स्तरावर UNGAमध्ये उपस्थित करणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तेथील जनतेला सांगितले.

काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाणार

दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती असून त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, असे सांगत इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरित्या भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली. काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाण्यास आम्ही तयार असल्याचे देखील त्यांनी जनतेला सांगितले. तसेच यापुढे भारत बालाकोटसारखे हल्ले पुन्हा करू शकणार नाही असे सांगून काश्मीरचा मुद्दा आम्ही लावून धरू असेही इम्रान खान यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक; एकाचा मृत्यू, एकाला अटक

काश्मीर मुद्द्यावर चर्चा करायची आहे

यावेळी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेशी संवाद साधताना भारतासोबत काश्मीर मुद्द्यावर चर्चा करायची असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ”आम्हाला शेजारील राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असून भारताने एक पाऊल पुढे आल्यास आम्ही दोन पावलं पुढे येऊ,” असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -