नर्स, महिला डॉक्टर्सना ब्लॅकमेल करणारा गजाआड

पाकिस्तानमध्ये सोशल मीडियाचा वापर करून २०० महिला डॉक्टर्स आणि नर्सना ब्लॅकमेल करणं सायबर स्टॉलरला चांगलंच महागात पडलं आहे.

Lahore
cyber crime
सायबर क्राइम

पाकिस्तानमध्ये सोशल मीडियाचा वापर करून २०० महिला डॉक्टर्स आणि नर्सना ब्लॅकमेल करणं सायबर स्टॉलरला चांगलंच महागात पडलं आहे. त्याचं हे दुष्कृत्य उजेडात आल्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी थेट तुरूंगात केली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला हा सर्वात मोठा सोशल मीडिया क्राईम ठरला आहे. दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायधीश सज्जाद अहमद यांनी अब्दुल वाहब या २४ वर्षाच्या तरूणाची रवानगी ही थेट जेलमध्ये केली आहे. शिवाय, त्याला ७ लाखांचा दंड देखील ठोठावला आहे. नर्स, महिला डॉक्टर्सना ब्लॅकमेल केल्यानं अब्दुल वाहबला १४ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संविधानानुसार ३८२-ब अंतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

काय होती अब्दुल वाहबची मोडस ऑपरेंडी?

मिलिटरी इंटलेजिन्स असल्याचं सांगत अब्दुल वाहबनं २०० नर्स आणि महिला डॉक्टर्सना अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल केलं. शिवाय, पैसे न दिल्यास सर्व अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करेन असं देखील धमकावलं. महिलांचे व्हॉटसअॅप अकाऊंट हॅक करून त्यांमधून त्याचे फोटो आणि व्हिडीओ चोरण्याचं काम अब्दुल वाहब करायचा. त्या व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे तो नर्स आणि महिला डॉक्टर्सना ब्लॅकमेल देखील करायचा. अखेर २०१५ साली त्याला अटक झाली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून केस चालवली गेली. यावेळी ३१ जणांच्या साक्षी देखील नोंदवल्या गेल्या. अखेर न्यायालयानं अब्दुल वाहबला २४ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. अब्दुल वाहबनं मेडिकल क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युऐशन देखील केलं आहे. दरम्यान, अब्दुलच्या वकिलांनी त्याला खोट्या केसेसमध्ये गोवण्यात येत असल्याचा दावा केला. पण, पुराव्यांपुढे त्यांचा हा युक्तीवाद मात्र लटका पडला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here