घरदेश-विदेश'भारतावर अणू बॉम्ब टाकून बेचिराख करु'

‘भारतावर अणू बॉम्ब टाकून बेचिराख करु’

Subscribe

पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियांदादने 'भारतावर अणू बॉम्ब टाकू' अशा फुशारक्या मारल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे नेते, सेलेब्रेटींचे डोके फिरले आहे. ते आता या विषयावर पाकिस्तानच्या माध्यमांना फार बालिश प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मियांदाद भारतावर अणू बॉम्ब टाकण्याच्या फुशारक्या मारत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे सेलेब्रेटी किती भैसाटले आहेत, याचा अंदाज बांधता येणार आहे. पाकिस्तानने कलम ३७० वरुन भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानचा हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पडला. याउलट आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली. त्यामुळे पाकिस्तानच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडली.

नेमके काय म्हणाला जावेद मियांदाद?

‘तुमच्याकडे अधिकृतपणे अणू बॉम्ब आहेत. तर त्याचा वापर निश्चितच करायला हवा. देशाच्या सुरक्षेसाठी अणू बॉम्बचा साठा तुम्ही करु शकता, असा जदभरात नियम आहे. कुणी हल्ला करणार आहे याची तुम्हाला माहिती मिळाली किंवा कुणी तुमच्यावर हल्ला करणार आहे तर एकटे मरु नका. शत्रूलाही ठार मारा. जेव्हा त्यांचे लोक मारली जातील, तेव्हा त्यांना जाणीव होईल की, माणसाची किंमत काय असते ते’ असे जावेद मियांदाद म्हणाला.

- Advertisement -

यापुढे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, ‘आम्ही नरेंद्र मोदींना अनेक वेळा बजावले आहे. आम्ही आमच्याकडील अणू बॉम्ब काही दाखवायला ठेवलेले नाहीत. आम्ही फक्त आता संधीची वाट बघतोय. त्यामुळे संधी मिळताच भारतावर अणू बॉम्ब टाकू आणि भारताला बेचिराख करु.’ मियांदादच्या प्रतिक्रियेवर भारतीयांकडून त्याच्यावर टीका होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मोदींना खुश करण्यासाठी इम्रान खान यांनी काश्मीरचा सौदा केला’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -