कुलभूषण जाधव यांना भारतीय वकिल देण्यास पाकिस्तानचा नकार

पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी भारतीय वकील नेमण्यास पाकिस्ताने नकार दिला आहे.

pakistan denied advocate kulbhushan jadhav
कुलभूषण जाधव

पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी भारतीय वकील नेमण्यास पाकिस्ताने नकार दिला आहे. जाधव यांना भारतीय वकिल द्यायचा म्हणजे आमच्या कायद्यात बदल करावा लागेल, असे कारण सांगत पाकिस्तानने भारताची मागणी फेटाळली आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हफीद चौधरी यांनी सांगितले की, ‘ज्या वकिलाकडे पाकिस्तानात कायद्याचा अभ्यास करण्याचा परवाना आहे. तोच वकी, जाधव यांचे प्रतिनिधित्व करु शकतो’.

दरम्यान, इस्लामाबाद हायकोर्टाने ३ सप्टेंबर रोजी कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी एक महिन्यांनी पुढे ढकलली होती. त्यामुळे त्यावेळी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याची हिंदुस्थानला आणखी एक संधी दिली जावी, असे निर्देश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले होते.

पाकिस्तानमधील लष्कर कोर्टाने एप्रिल २०१७ ला कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर आणि दहशतवादी असल्याचा आरोप करत मृत्यूची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काही आठवड्यांनी भारताने जाधव यांच्यापर्यंत दुतावास पोहोचू न दिल्याने तसेच त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) मध्ये याचिका दाखल केली. आयसीजेने तेव्हा पाकिस्तान कोर्टाने दिलेल्या निर्णयावर स्थगिती आणली.


हेही वाचा – कुलभूषण जाधवसाठी भारताच्या दबावाखाली येऊन कायदा बदलणार नाही; पाक बरळला