घरदेश-विदेशपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक

Subscribe

पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे भारताकडून हॅक केल्याचा संशय पाकिस्तानने व्यक्त केला आहे. दरम्यान, हॅकर्सचा शोध सुरु असल्याचे पाकिस्तानने सांगितले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. काही हॅकर्सने शनिवारी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक केली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही देशाच्या लोकांनी सांगितले की तुमची वेबसाईट ओपन होत नाहीये. त्यानंतर आमची वेबसाईट हॅक झालेचे समोर आले. सध्या वेबसाईट सुरु असल्याचा दावा पाकिस्तानने केला असून हॅकर्सचा शोध सुरु असल्याचे देखील पाकिस्तानने सांगितले आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे भारताकडून हॅक केल्याचा संशय पाकिस्तानने व्यक्त केला आहे.

वेबसाईट सुरु करण्याचे काम सुरु

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी सांगितले की, आयटी टीमने यावर नियंत्रण मिळवले आहे. वेबसाईट सुरु करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. मात्र पाकिस्तानमध्ये ही वेबसाईट सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पाक परराष्ट्र मंत्रालयानुसार, ऑस्ट्रेलिया, सऊदी अरब, यूके आणि नेदरलँडमध्ये वेबसाईट वापरणाऱ्यांनी वेबसाईट सुरळीत चालत नसल्याचे सांगितले. पुलवामा हल्ल्याच्या तीन दिवसानंतर पाक परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

५० पेक्षा जास्त देशाने केला निषेध

गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. जैश-ए-मोहम्मदच्या आदिल अहमद डार याने २५० किलो आरडीएक्सने भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसवर धडकवली. या स्फोटामध्ये ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानचा बदला घ्या अशी भावना जनतेने व्यक्त केली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर भारताने कारवाई करत पाकिस्तानकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. ५० पेक्षा जास्त देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -