घरदेश-विदेशपाकिस्तानकडून भारताला '१० सर्जिकल स्ट्राइक'ची धमकी

पाकिस्तानकडून भारताला ‘१० सर्जिकल स्ट्राइक’ची धमकी

Subscribe

पाकिस्तानकडून भारताला १० सर्जिकल स्ट्राइकची धमकी आली आहे. भारताने पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केला तर दहा पटीने जास्त प्रत्युत्तर देऊ, असे पाकिस्तानचे लष्कर प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर बरळले आहेत.

भारताने पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केला तर पाकिस्तान त्याचे दहापट उत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तानकडून भारताला मिळाली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ही धमकी दिली आहे. शिवाय, आता पाकिस्तान पुर्वीसारखा राहिलेला नसून पाकिस्तानचे लष्कर शक्तिशाली बनले आहे. त्यामुळे भारताने पुन्हा तशी हिंमत केली तर आम्ही दहापटाने जास्त उत्तर देऊ, असं गफूर बरळले आहेत. ते लंडन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या गफूर हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद यांच्यासोबत विदेश दौऱ्यावर आहेत.

सर्जिकल स्ट्राइकचं दुखणं अजूनही भळभळतं

भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान विरोधात सर्जिकल स्ट्राइक केला होता. सुरुवातीला पाकिस्तानने हा सर्जिकल स्ट्राइक झालाच नाही, असा आव आणला होता. आता मात्र याच सर्जिकल स्ट्राइकवर पाकिस्तानने खोचक अशी प्रतिक्रीया दिली आहे. या प्रतिक्रीयेतून सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानला झालेली जखम अजूनही भळभळतीच आहे, असं दिसून येत आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय मीडियाने पाकिस्तानचा चांगला चेहराही दाखवावा – गफूर

पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या लोकशाहीशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आले. या प्रश्नांचे उत्तर देताना गफूर म्हणाले की, पाकिस्तानमधील लोकशाही पारदर्शक असे आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडणूका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर ते म्हणतात की, ‘निवडणूकवेळी लोकशाहीवर दडपण आल्याच्या घटना घडत असतील तर त्यांनी तशा घटना समोर आणाव्या’. त्याचबरोबर देशात पूर्णपणे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे. पाकिस्तानमध्ये विकास कामे जास्त होत असून, आंतरराष्ट्रीय मीडियाने पाकिस्तानचा चांगला चेहरा देखील जगासमोर आणावा, असंही गफूर म्हणाले.

हेही वाचा – पाकिस्तानी अधिकाऱ्यानेच चोरले पाकीट

हेही वाचा –  पाकिस्ताननं भारतीय हद्दीत घुसवलं हेलिकॉप्टर! पाहा व्हिडिओ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -