घरदेश-विदेश'जगात पाकिस्तानची प्रतिमा मलिन' पाकिस्तानी मंत्र्यांचे सत्यकथन

‘जगात पाकिस्तानची प्रतिमा मलिन’ पाकिस्तानी मंत्र्यांचे सत्यकथन

Subscribe

दहशतवादी देश म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या पाकिस्तानला आता त्यांच्याच गृहमंत्र्यांकडून घरचा अहेर मिळाला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना पाकिस्तानी गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी जगात पाकिस्तानची प्रतिमा बेजबाबदार देश म्हणून झाल्याची खंत व्यक्त केलीय. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एजाज अहमद यांनी सांगितले की, “पाकिस्तानात दहशतवादी संघटना अस्तित्वात आहेत. या त्याच दहशतवादी संघटना आहेत ज्यांनी अफगाणिस्तानमध्ये युद्ध आणि काश्मीरमध्ये अशांतता परवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.”

महिन्याभरापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील म्हटले होते की, ३० ते ४० हजार दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले आहे. ते हेच दहशतवादी आहेत ज्यांनी अफगाणिस्तान आणि काश्मीरच्या संघर्षात सहभाग घेतला होता. मात्र, यावेळी गृहमंत्री एजाज शाह यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या सुटकेवर सरकारची भूमिका काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.

- Advertisement -

एजाज म्हणाले, काश्मीरबाबत आम्ही जगाला सांगतोय की, तिथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. लोकांना औषधेही मिळत नाहीत. मात्र, जग आमच्यावर विश्वास ठेवत नाही. जगाचा भारतावरच विश्वास आहे. कारण अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास संपादन करणे एका दिवसात होणारी गोष्ट नाही, त्याला अनेक वर्षे जावी लागतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानने विश्वास गमावल्याचे खापर शाह यांनी पूर्वीच्या सरकारवर फोडले आहे. पाकिस्तानात यापूर्वी सत्तेत असलेल्या श्रीमंत वर्गाने देश बरबाद केला आहे. त्यांनी या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब केले आहे. आपण सर्वकाही गमावून बसलो आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -