पाक घाबरला!

पाकव्याप्त काश्मीरमधील गावे रिकामी, हॉस्पिटलमध्ये बेड जवानांसाठी आरक्षित

Delhi
Major General Asif Ghafoor i
असिफ

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर चारी बाजूने झालेल्या कोंडीमुळे पाकिस्तान हादरला आहे. त्याच इस्रायल, अमेरिका, रशियासारख्या देशांनीही भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, भारतानं निर्णायक कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करील, अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळे पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केली आहे. हॉस्पिटलमधील बेड जवानांसाठी २५ टक्के आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील गावे रिकामी केली आहेत.

लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर लॉन्चपॅडवरील सर्व दहशतवाद्यांना तिथून हटवलं आहे. पाकव्याप्त काश्मीर सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये, रात्रीच्या वेळी गरज नसल्यास विजेचे दिवे लावू नका, असे निर्देश पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना दिले आहेत.

युद्धाच्या परिस्थितीत क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सामान्य आणि लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांना दाखल केले जाऊ शकते. प्राथमिक उपचारानंतर या सैनिकांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याची योजना आहे,’ असे पाकिस्तानी कमांडर एशिया नाज यांनी जिलानी रुग्णालयाच्या अब्दुल मलिक यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे.

पाकिस्तानने सियालकोट बॉर्डरजवळ स्वतःचे रणगाडे पाठवले आहेत.
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक गावांना रिकामी केले आहे, तसेच इतर लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधल्या 127 गावांना हाय अलर्ट जारी केला आहे. नियंत्रण रेषेजवळच्या 40 गावांना रिकामी केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरले आहे. भारतीय शहीद जवानांच बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत भारतान पाकिस्तानला दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here