घरदेश-विदेशकुलभूषण जाधव यांना दिलासा; पाकिस्तानने वाढवून दिला अध्यादेशाचा कालावधी

कुलभूषण जाधव यांना दिलासा; पाकिस्तानने वाढवून दिला अध्यादेशाचा कालावधी

Subscribe

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ४ महिन्यांचा अधिकचा कालावधी वाढवून दिला आहे. पाकिस्तानच्या संसदेत कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधीत अध्यादेशाला चार महिन्यांची वाढ देण्यात आली आहे. हा अध्यादेश आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या आदेशानुसार कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्याची परवानगी देते. आंतरराष्ट्रीय कोर्टात हा अध्यादेश मे महिन्यात आणला होता. याचा कालावधी १७ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्याचा कालावधी संपण्याआधीच सोमवारी पाकिस्तानी संसदेत तो वाढवून देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या साप्ताहिक निवेदनात म्हटले होते की, भारताने काऊन्सिलर अॅक्सेस स्टँड मांडले आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत. यापूर्वीही आम्ही भारताला विना अडचण काऊन्सिलर अॅक्सेस दिला होता. तसेच पाकिस्तार भारताच्या दबावाखाली येऊन कुलभूषण जाधवसाठी देशाचा कायदा बदलू शकत नाही.

- Advertisement -

पाकिस्तानमधील लष्कर कोर्टाने एप्रिल २०१७ ला कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर आणि दहशतवादी असल्याचा आरोप करत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काही आठवड्यांनी भारताने जाधव यांच्यापर्यंत दुतावास पोहोचू न दिल्याने तसेच त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) मध्ये याचिका दाखल केली. आयसीजेने तेव्हा पाकिस्तान कोर्टाने दिलेल्या निर्णयावर स्थगिती आणली.

हेही वाचा –

लस तयार करण्यात भारताची प्रमुख भूमिका; पुरवठा करणं आव्हानात्मक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -