घरदेश-विदेश'मोदींना खुश करण्यासाठी इम्रान खान यांनी काश्मीरचा सौदा केला'

‘मोदींना खुश करण्यासाठी इम्रान खान यांनी काश्मीरचा सौदा केला’

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांनी इम्रान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'इम्रान यांनी पाकिस्तानचा सौदा केला', असा आरोप त्यांनी केला.

काश्मीर मुद्द्यावरुन आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माजी पत्नी आणि ब्रिटिश-पाकिस्तान पत्रकार रेहम खान यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी इम्रान खान यांनी काश्मीरचा सौदा केला’, असे रेहम खान म्हणाल्या आहेत. त्यामुळे इम्रान खान यांची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर पाकिस्तान भारतावर टीका करत आहे. या मुद्द्यावरुन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला घेरण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, अखेर यात पाकिस्तान अपयशी ठरला. त्यानंतर पत्रकार रेहम खान यांनी केलेली टीका इम्रान खान यांना अडचणीत आणणारी ठरु शकते.

नेमके काय म्हणाल्या रेहम खान?

रेहम खान यांनी एका मुलाखतीत या विषयावर भाष्य केले आहे. याबाबत आयएएनएस वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. या मुलाखतीत रेहम खान म्हणाल्या की, ‘काश्मीर हा पाकिस्तानचाच एक भाग असून तो लवकरच पाकिस्कतानचा भाग होणार, अशी गोष्ट आम्हाला शिकवली गेला. मात्र, इम्रान खानने काश्मीरचा सौदा केला. यापुढे रेहम म्हणाल्या की, ‘नरेंद्र मोदींनी तेच केले, जे त्यांना करायचे होते. कलम ३७० रद्द करण्यासाठी त्यांना बहुमत मिळाले होते. मात्र, इम्रान खान काही करू शकले नाहीत. इम्रान वारंवार बोलायचे की, काश्मीरच्या बाबत मोदींचा वेगळा प्लॅन आहे. इम्रान खान यांना ही गोष्ट खरच माहित होती, तर त्यांनी काहीच का केले नाही? ते मोदींना वारंवार फोन करुन त्यांची बोलण्याचा काय प्रयत्न करत होते?’ रेहम खान यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रेहम खान यांच्यासोबत इम्रान यांची २०१४ साली लग्न केले होते. मात्र, एक वर्षातच त्यांचे नाते तुटले होते. त्यानंतर रेहम यांनी सोशल मीडियावर अनेकदा इम्रान यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प यांची मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -