घरदेश-विदेशहिंदूंबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्यांची हकालपट्टी

हिंदूंबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्यांची हकालपट्टी

Subscribe

हिंदू विरोधी बोलणाऱ्या मंत्री फैयाज अल हसन चौहान यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशावरून मंत्री पदावरून काढून टाकण्यात आले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर २४ फेब्रुवारीला एका सभेमध्ये बोलताना फैयाज अल हसन चौहान यांनी हिंदू विरोधात विधान केले होते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील मंत्री फैयाज अल हसन चौहान यांना मंगळवारी काढून टाकण्यात आले. चौहान यांच्या वक्तव्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी आणि अल्पसंख्याक समुदयाच्या मंत्र्यानी त्यांच्यावर तीव्र टिका केली. हिंदू विरोधी वक्तव्यामुळे चौहान यांना राजीनामा द्यावा लागला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चौहान यांच्या हिंदू विरोधी टिकेला गंभीरतेने घेतली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानंतर चौहान यांच्यावर कारवाई करण्यात आली.

वक्यव्यामुळे माफी मागितली

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानंतर पाकिस्तान पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्री फैयाज अल हसन चौहान यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलवून राजीनामा देण्यास सांगितले. तसेच चौहान यांना त्यांच्या हिंदू विरोधी वक्तव्यावर स्पष्टीकरण सुद्धा मागितले. यापूर्वीही चौहान यांच्या तक्रारी समोर आल्या होता त्यांबद्दल त्यांना समज सुद्धा देण्यात आली होती. तसेच हिंदू विरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांनी त्यासंबंधी माफी मागितली.

- Advertisement -

चौहन यांचे स्पष्टीकरण 

पाकिस्तानच्या तहरीक-ए-इंसाफचे मंत्री फैयाज अल हसन चौहान यांना हिंदू विरोधी वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले त्यामध्ये त्यांनी म्हटले की, मी जे हिंदू विरोधी वक्यव्य केले. माझे वक्तव्य पाकिस्तानी हिंदू विरोधात नसून, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय लष्कर, तसेच तिथल्या मीडियासाठी होते, असे चौहान यांनी म्हटले. माझ्या टिकेमुळे जर पाकिस्तानमधील हिंदू सामाजाला वाईट वाटले असेल तर मी त्यांची माफी मागतो. माझे वक्तव्य हे पाकिस्तानी हिंदू सामाजा विरूद्ध नव्हते. पाकिस्तानी हिंदूंवर नाही तर भारतीय हिंदूंवर त्यांचा निशाणा होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -