घरदेश-विदेशपाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी सरकारी चॅनेलची 'बेगिंग'!

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी सरकारी चॅनेलची ‘बेगिंग’!

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका भाषणाची क्लिप सोशल मीडियावर सध्या भलतीच व्हायरल होत आहे. हे भाषण चीनच्या बिजिंगमधील असून त्यावर ठिकाणाचं नाव म्हणून बिजिंग ऐवजी बेगिंग असं इंग्रजीमध्ये लिहिलेलं दिसतंय!

सोशल मीडियावर सध्या अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांइतकाच एक विषय जोरदार व्हायरल होत आहे. हा विषय पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी संबंधित आहे. प्रत्यक्ष पंतप्रधानांच्याच मुलाखतीसाठी पाकिस्तानच्या सरकारी वृत्तवाहिनी अर्थात चॅनेलने चक्क ‘बेगिंग’ केलं आहे. आणि ‘बेगिंग’चा मराठी अर्थ ‘भीक मागणे’ असा होतो. त्यामुळे एरव्हीच त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होणारे पाकिस्तान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या अजेंड्यावर आले आहेत.

नक्की काय झाला गोंधळ?

सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनच्या दौऱ्यावर आहेत. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पाकिस्तानसाठी आर्थिक मदतीचं पॅकेज मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी या दौऱ्याचं आयोजन केलं आहे. यासंदर्भातच रविवारी इम्रान खान चीनची राजधानी बिजिंगमध्ये सेंट्रल पार्टी स्कूलच्या एका कार्यक्रमात भाषण करत होते. त्यांचं हे भाषण पाकिस्तानचं सरकारी न्यूज चॅनेल पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन (PTV) लाइव्ह दाखवत होतं. पण तिथेच गोंधळ घातला. या चॅनेलमध्ये ग्राफीक्सवर काम करणाऱ्या माणसाने इम्रान खान यांच्या भाषणाचं लोकेशन अर्थात ठिकाणाचं इंग्रजी स्पेलिंग बिजिंग अर्थात ‘Beijing’ असं न लिहिता बेगिंग म्हणजेच ‘Begging’ असं टाईप करून टाकलं! बेगिंगचा मराठीत अर्थ भिक मागणे असा होतो. त्यामुळे जगभरात या प्रकाराची खिल्ली उडवली गेली.

- Advertisement -

२० सेकंदाचा खेळ, दिवसभर धुमाकूळ!

दरम्यान, पीटीव्हीवर हे बिजिंगचं बेगिंग तब्बल २० सेकंद दिसत होतं. सामान्यपणे २० सेकंदांचा वेळ आपल्याला फारच कमी वाटत असला, तरी हे २० सेकंद पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं लाइव्ह भाषण ‘बेगिंग’ या नावाखाली चालवलं गेलं आणि ते जगभरातल्या लोकांनी पाहिलं. त्यामुळे त्या २० सेकंदांनी सोशल मीडियावर अक्षरश: दिवसभर धुमाकूळ घातला! PTV ने नंतर यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करणारा संदेश जारी करून संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई देखील केली. मात्र, चीनमध्ये पाकिस्तानसाठी आर्थिक मदत ‘मागायला’ गेलेल्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याच लाइव्ह भाषणासाठी टीव्हीवर ‘बेगिंग’ लिहिण्याची चूक घडावी, हा योगायोग चोख जुळून आला, अशा आशयाचं ट्रोलिंग दिवसभर नेटिझन्समध्ये सुरू होतं.

कसं झालं ‘Beijing’चं ‘Begging’? पाहा व्हिडिओ! 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -