घरदेश-विदेशशांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानची मोठी कुरापत

शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानची मोठी कुरापत

Subscribe

काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानने नियंत्रण रेषा भागात दहशतवाद्यांसाठी सात लाँच पॅड आणि २७५ जिहादींना सक्रिय केले आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान काश्मीरी जनतेच्या मनात भारत सरकार विरोधात असंतोष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. या मुद्द्यावरुन पाकिस्तानने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही पाकिस्तान अयशस्वी ठरला. त्यामुळे आता पाकिस्तानने नियंत्रण रेषा (एलओसी) भागात दहशतवादी तळ सुरु केल्याची माहिती गुप्तचर यंत्रनांना मिळाली आहे. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे. पाकिस्तानने एलओसी भागात सात दहशतवादी लाँच पॅड सुरु केले आहेत. त्याचबरोबर २७५ जिहादी या भागात सक्रिय केले आहेत. याशिवाय पाकिस्तानने एलओसीजवळ अफगाण आणि पश्तून सैनिकांना तैनात केले आहे. भारता विरोधात लढण्यासाठी कोणताही मुद्दा मिळत नसल्याने आता भारताने थेट जिहादींना एलओसीमध्ये सक्रिय केले आहे.

हेही वाचा – जम्मू-काश्मीर: कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान

- Advertisement -

याअगोदरही पाकिस्तानने जिहादींना एलओसीत केले होते सक्रिय

पाकिस्तानने याअगोदरही जिहादींना एलओसीमध्ये तैनात करुन काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता. भारता विरोधात प्रॉक्सी युद्ध छेडण्यासाठी पाकिस्तानने हा प्रयत्न केला होता. याअगोदर १९९० साली जम्मू-काश्मीरमध्ये असंतोष पसरवण्यासाठी पाकिस्तानने अफगाण आणि पश्तूच्या जिहादींना एलओसी भागात सक्रिय केले होते. मात्र, भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर काश्मीर बिथरले होते आणि सर्व जिहादींना तेथून हलवले होते. दरम्यान, आता काश्मीरमध्ये हिंसा घडवण्यासाठी पाकिस्तान पाकव्याप्त काश्मिरच्या जनतेचा उपयोग करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -