घरदेश-विदेशभारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानने मसूद अजहरला सोडलं?

भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानने मसूद अजहरला सोडलं?

Subscribe

पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची कैदेतून सुटका केल्याची माहिती समोर आली असून भारतविरोधी मोठी दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत पाकिस्तान असल्याचं सांगितलं जात आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला पाकिस्तानने सोडल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकल्याचा राग काढण्यासाठी आणि त्यासाठीच भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच अटक केलेल्या मसूद अजहरला सोडून दिलं आहे. याशिवाय, राजस्थान आणि इस्लामाबादमध्ये सीमेवर देखील पाकिस्तानने अतिरिक्त सैन्य तैनात केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर संस्था असलेल्या आयबीने सरकारला पाकिस्तानच्या संभाव्य योजनांबद्दल सतर्क केलं आहे. भारतविरोधी दहशतवादी कारवाया करण्यासाठीच मसूद अजहरला सोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयबीने दिलेल्या इशाऱ्यानुसार सियालकोट-जम्मू-कश्मीर भागामध्ये मोठी दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी

गेल्याच महिन्यात आपली दहशतवादविरोधी भूमिका जगाला दाखवण्यासाठी पाकिस्तानने मसूद अजहरला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यंमध्येच त्याला पुन्हा सोडण्यात आल्यामुळे पाकिस्तानवर पुन्हा आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. कलम ३७० संदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानने त्याविरोधात भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू लागला आहे. आर्थिक निर्बंध लादले गेल्यामुळे पाकिस्तानची नाकेबंदी सुरू झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांचा रोष सरकारला पत्करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे वरिष्ठ नेते भारतविरोधी मतप्रदर्शन करून तिथल्या जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मसूद अजहरने पुन्हा उडवली भारताची खिल्ली

‘..तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ’

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कलम ३७० बद्दलच्या भारताच्या निर्णयावर ‘पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल, असं वक्तव्य केलं होतं. त्यासोबतच, ‘पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाने लादलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर जे काही होईल, त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायच जबाबदार राहील’, असं देखील इम्रान खान म्हणाले आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांनी देखील ‘भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता आहे आणि ते जिंकण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतं’, असं वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारचा मसूद अजहरला सोडण्याचा निर्णय भारतासाठी काळजी करण्याचं कारण ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -