घरदेश-विदेशपाकिस्तानची मुक्ताफळं, इम्रानला द्या शांततेचं 'नोबेल'

पाकिस्तानची मुक्ताफळं, इम्रानला द्या शांततेचं ‘नोबेल’

Subscribe

'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या', असा प्रस्ताव पाकिस्तान सरकारकडून संसदेत देण्यात आला आहे.

‘पुलवामा हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा काहीच हात नाही’, असं संतापजनक वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी नुकतचं केलं. त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असताना आता पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि जम्मू-काश्मीर सीमेवर सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सरकारने एक विचित्र मागणी केली आहे. ‘सध्या भारतासोबत असलेला तणाव कमी करण्यासाठी शांततेचं पाऊल उचलणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या”, अशी मागणी पाकिस्तान सरकारकडून करण्यात आली आहे. पाक सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव थेट संसदेत सादर केला आहे. पुलवामा हल्ला आणि त्या हल्ल्याला भारताने दिलेलं चोख प्रत्युत्तर यानंतर दोन्ही देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, हा तणाव कमी करुन यातून सांमजस्याने मार्ग काढला जावा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.


पाहा : पाकिस्तान ‘भिकारी’, दहशतवादी ‘डुकरं’… लोकांचा उच्छाद

पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं उघड झाल्यानंतर, भारतीय वायुसेनेने स्ट्राईक बॅक करत जैशचे तळ नष्ट रेले होते. पाकनेही भारताच्या हद्दीत लढाऊ विमानं घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न हाणून पाडताना भारताचं मिग-२१ हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं. या विमानातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात सापडले होते. या दरम्यान, अभिनंदन यांना ताब्यात ठेवल्यामुळे तसंच पाकिस्तानकडून हवाई हद्दीचं उल्लंघन केल्यामुळे भारतीय वायुसेनेकडून लष्करी कारवाई होण्याची दाट शक्यता होती. या सगळ्या घडामोडींंमुळे एकंदरच दोन्ही देशातील वातावरण गेल्या काही काळापासून तणावपूर्ण झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सगळ्यावर पांघरुण घालत, दोन्ही देशात सामंजस्याचे आणि शांतेतेचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी मागणी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी भारताला शांतता चर्चेचं निमंत्रणही पाठवलं होतं. जिथे एकीकडे त्यांच्या या ‘ढोंगीपणा’वर संपूर्ण भारतातून तसंच जगभरातून टीका होत आहे, तिथे त्यांच्या सरकारने यासाठी त्यांनी ‘शांतेतेचं नोबेल’ दिलं जावं अशी मागणी केली आहे. पाकचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत प्रस्ताव आणताना हीच भूमिका मांडली. ‘इम्रान यांनी शांततेसाठी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे’, असंही ते म्हणाले.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -