घरदेश-विदेशपाकिस्तानची भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी!

पाकिस्तानची भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी!

Subscribe

जम्मू- काश्मीर सीमारेषेवर दररोज लष्करी कारवाईच्या घटना घडत आहेत. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात रोज चकमकी उडत आहेत. ६ एप्रिल २०१८ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा २० वर्षीय अतिरेकी झैबुल्ला ऊर्फ हमजाला अटक केले. झैबुल्लाने एनआयएला दिलेल्या कबुलीनुसार पाकिस्तान भारतात शस्त्रास्त्रांचे तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे.

झैबुल्ला याने एनआयएला दिलेल्या जवाब हा आपल्या देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने फार महत्वाचा आहे. आतापर्यंत चकमकींमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळ शस्त्रास्त्रे आढळली. यावरुन, असा तर्क लावला जायचा की, हे दहशतवादी सुरक्षा यंत्रणांची शस्त्रास्त्रे चोरत असावीत. परंतू, वास्तवात पाकिस्तानच भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

गृहमंत्र्यांचे नियंत्रण रेषेजवळ दक्षता वाढवण्याचे आदेश
पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. देशाची संरक्षण व्यवस्था कितीही प्रबळ असली तरी दहशतवाद ही एक गंभीर समस्या आहे. हे दहशतवादी पाकिस्तानातून घुसखोरी करुन भारतीय लष्करी तळांवर हल्ला करतात.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जाणाऱ्या नियंत्रण रेषेच्या भागात दक्षता वाढविण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, उच्चस्तरीय बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या माध्यमातून शेजारी देशांशी असलेल्या सीमावर्ती बागा, रस्ते आणि भारतीय सीमेवरील चौक्या उभारण्याच्या कामाचा आढावा घेतला गेला. प्रवक्त्यांनी सांगितले की सीमावर्ती भागात सतत दक्षता व सुरक्षा कायम राखण्यासाठी संबंधित सर्व

- Advertisement -

अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेसंबंधी, राजनाथ सिंग यांनी समाधान व्यक्त केले. सीमावर्ती भागात कुंपन बांधणीचे काम ९७ टक्के पूर्ण झाली आहे. तसेच सिंग यांनी ‘व्यापक एकीकृत बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम’ (सीआयबीएमएस) या पायलट प्रकल्पाच्या भौतिक अडथळ्यांचा अंमलबजावणीचा आढावा घेतला.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -