पाकिस्तानमधील हॉस्पिटलमध्ये आत्मघाती हल्ला; ३ जण ठार, ८ जखमी

Islamabad

पाकिस्तानमधील एका हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आत्मघाती हल्ला असून हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हा हल्ला झाला आहे. यामध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रार्थमिक माहिती समोर येत आहे. तर ८ जण गंभीर जखमी आहेत. हा हल्ला पाकिस्तानच्या डेरा इस्माइल खान या जिल्हा मुख्यालय हॉस्पिटलमध्ये झाला आहे.