मुस्लिम देशांनी भारताकडून धर्म शिकावा – दलाई लामा

Farrukhabad
dalai lama
तिबेटियन दलाई लामा

तिबेटियन अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी आज बांग्लादेश, पाकिस्तान आणि सिरिया सारख्या मुस्लिम देशांनी भारताकडून धर्म शिकावा, म्हणजे जगात शांतता नांदेल, असा सल्ला दिला आहे. “भारतात १२५ कोटींच्यावर लोकसंख्या असून अनेक धर्म आणि पंथ आहेत. तरिही भारतात शांतता नांदते. त्यामुळे मुस्लिम देशांनी भारताकडून शांतता शिकावी. भारतात सर्वधर्मीयांमध्ये योग्य समन्वय असून आधुनिक भारत विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.”, अशी भूमिका दलाई लामा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दलाई लामा यांना यावेळी डोकलाम वादावरही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी दलाई लामा यांनी सांगितले की, “दोन्ही देशांनी एकत्र बसून या वादावर तोडगा काढला पाहीजे. ‘हिंदी चीनी भाई-भाई’ हा नारा त्यासाठी चपखल बसतो.”

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here