पाकमध्ये लागणार ‘पाप कर’

पाकिस्तानमध्ये सरबत आणि सिगारेट पिणाऱ्यांवर सिन टॅक्स (पापकर) लावण्यात येणार आहे. पाकिस्तानचे आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

Islamabad
pakistan smoking
प्रातिनिधिक फोटो

पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे. अमेरिकाकडून मिळणारी मदत थांबवल्यामुळे आर्थिक दृष्टीने कंबर मोडली असल्यामुळे पाकिस्तानमध्ये जनतेची पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानमध्ये लवकरच आता नवीन कर आकारला जाणार असल्याची माहिती पाकच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘सिन टॅक्स’ असे या कराचे नाव आहे. पाकिस्तानमध्ये साखरेचे शरबत आणि सिगारेट पिणाऱ्यांकडून हा टॅक्स वसूलला जाणार आहे. त्यामुळे पाकच्या नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. मात्र लोकांचे स्वास्थ सुरक्षित राहावे यासाठी हा कार आकारला जाणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. या करातून जमा झालेले पैसे पाकिस्तान आरोग्य योजनांसाठी खर्च करणार असल्याचा दावा केला जात आहे.

लोकांनी केले आरोप

सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी हा कर लोकांवर लादत असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. या वर्षी आरोग्य बजेट वाढवणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. आरोग्य बजेटला पाकिस्तान सरकार ५ टक्क्यांवर घेऊन जाते आहे. जगातील इतर ४५ देशांमध्ये हा कर आकारण्यात येत असल्यामुळे पाकिस्तानमध्येही हा कर लागू करणार आहे.

“देशातील लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी हा कर लावला जात आहे. तंबाखू, सॉफ्ट ड्रिंक्स, फास्टफुड, कॉफी आणि साखर यावर हा कर आकारला जाईल. सरकार बरोबर झालेल्या एका बैठकीमध्ये हा मुद्दा पुन्हा उचलण्यात आला. यावेळी पंतप्रधांनीही या कराला लकरच मंजूरी मिळेल असे आश्वासन दिले. म्हणून लवकरच हा कर लादला जाणार आहे.”- आरोग्यमंत्री डॉ. असद हफीझ

एका वेबसाइटने प्रसारित केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात १ लाख ६० हजार १०० नागरिकांचा मृत्यू तंबाखू मुळे होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा कर लादला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here