घरदेश-विदेश'दहशतवाद न थांबवल्यास पाकिस्तानचे तुकडे होतील'

‘दहशतवाद न थांबवल्यास पाकिस्तानचे तुकडे होतील’

Subscribe

‘पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार करणे थांबवले नाही, तर या देशाचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही’, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. ते काल, शनिवारी सूरत येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या १२२ सैनिकांच्या कुटुंबीयांचा येथील एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

काय म्हणाले संरक्षणमंत्री 

‘काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणे पाकिस्तानला अवघड जात आहे. या मुद्द्यावरून त्यांनी संयुक्त राष्ट्रांपर्यंत जाण्याचा व त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही’, असे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर भारतातील अल्पसंख्याकांच्या लोकसंख्येत वाढ झाली. परंतु पाकिस्तानमध्ये शीख, बौद्ध व इतरांचे मानवी हक्क पायदळी तुडवण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. अन्य कुणी पाकिस्तानचे तुकडे करण्याची गरज नाही. दहशतवादाला पाठीशी घालणे थांबवले नाही, तर पाकचे आपोआप तुकडे होतील.’

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईकरांनो, टॅक्सीवाले मीटरमध्ये कसे फसवतात माहितीये? बटणाकडे लक्ष ठेवा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -