घरदेश-विदेशकुलभूषण जाधव यांना मिळणार राजनैतिक मदत; पाकिस्तानला उपरती

कुलभूषण जाधव यांना मिळणार राजनैतिक मदत; पाकिस्तानला उपरती

Subscribe

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) फटकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्यासाठी तब्बल १६ वेळा नकार देणाऱ्या पाकिस्तानला अखेर उपरती आली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) फटकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्यासाठी तब्बल १६ वेळा नकार देणाऱ्या पाकिस्तानला अखेर उपरती आली आहे. आयजीजेच्या निकालानंतर २४ तासातच पाकिस्तानने स्वत:ला जबाबदार देश असल्याचे सांगत गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला आहे. यासंबंधी पाकिस्तानी मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील कायद्यानुसार भारतीय नागरिक असलेल्या जाधवना राजनैतिक मदत देण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. महत्वाचे म्हणजे याआधी पाकिस्तानने सलग १६ वेळा जाधव यांना राजनैतिक मदत देण्यास भारताला नकार दिला होता. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालायचे दरवाजे ठोठावले होते.

- Advertisement -

पाकिस्तान मंत्रालयाने स्पष्ट केले की

कुलभूषण जाधव यांना राजनैतिक संबंधांबाबत व्हिएन्ना करारानुसार त्यांच्या अधिकाराची माहिती देण्यात आली आहे. एक जबाबदार देश असल्याच्या नात्यातून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसार ही मदत पोहोचवली जाईल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला आदेश देत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पुन्हा विचार करण्याच आणि राजनैतिक मदत देण्याचे आदेश दिले होते. हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जाधव यांना २०१७ मध्ये पाकिस्तानने कथित हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -