घरदेश-विदेशपाकिस्तानचा खोटेपणा उघड; पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाचे अवशेष सापडले

पाकिस्तानचा खोटेपणा उघड; पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाचे अवशेष सापडले

Subscribe

पाकिस्तानने बुधवारी भारताच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी केली. त्यावेळी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या एफ- १६ या लढाऊ विमानाला पाडले.

पुलवामा दहशवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळाला उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने बुधवारी भारताच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी केली. त्यावेळी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या एफ- १६ या लढाऊ विमानाला पाडले. भारताकडून पाडण्यात आलेले एफ- १६ या विमानाचे अवशेष पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याचे काही फोटो शेअऱ केले आहेत.यामध्ये विमानाचे काही अवशेष पडलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये एफ- १६ विमानाच्या इंजिनचा भाग दिसत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानची पोलखोल

पाकिस्तानने मात्र त्याच्या एकही लढाऊ विमानाला भारताने पाडले नसल्याचा खोटा दावा केला होता. ऐवढेच नाही तर, पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांनी तर एफ- १६ या विमानाचा वापरच झाला नसल्याचा खोटा दावा केला होता. हे फोटो समोर आल्यानंतर पाकिस्तानची पोल खोल झाली आहे. पाकिस्तानी मीडियाने तर एफ – १६ या विमानाच्या अवशेषाच्या हे भारताच्या मिग – २१ या विमानाचे असल्याचे सांगितले होते. आता तर हे स्पष्ट झाले आहे की, ते जे विमानाचे अवशेष सापडले आहे त्यामध्ये एफ- १६ विमानाचे इंजिन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यावेळी भारताने एफ – १६ विमान पाडले त्यावेळी त्यामधील पायलट प्यॅराशूच्या सहाय्याने खाली उतरताना दिसला. हे विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -