जयपूर कारागृहात पाकिस्तानी कैद्याचा खून

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कैदी शकील उल्लाह याची हत्या केल्याची घटना जयपूर येथे घडली आहे. जयपूर मध्यवर्ती कारागृहात शकील मागील काही वर्षांपासून शिक्षा भोगत होता.

Jaipur
Murder
प्रातिनिधिक फोटो

जयपूर येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानी कैद्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारागृहातील ईतर चार कैद्यांनी त्याचा खून केला असल्याची माहिती मिळत आहे. टीव्ही बघण्याच्या वादावरून हा खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर भारतीचा हल्ला होत असल्याचे चित्र आहे. मात्र या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शकील उल्लाह असे या मयत पाकिस्तानी कैद्याचे नाव आहे. मार्च २०११ पासून हा कैदी जयपूर येथे शिक्षा भोगत होता. या प्रकरणी जयपूर पोलिसांनी चार कैद्यांवर खूनाचा आरोप केला आहे. या प्रकरणी मॅजिस्टरियल चौकशीची मागणी केली जात आहे.

कोण होता शकील

शकील उल्लाह हा मोहम्मद हनीफ म्हणूनही ओळखला जातो. शकील हा पाकिस्तानयेथील सियाकोटचा मूळ रहिवासी आहे. २०१० मध्ये लष्कर-ए-तोइबामध्ये प्रवेश करण्यासाठी पंजाबमधील स्थानिक लोकांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याच्या प्रयत्नाअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. पंजाबच्या फिरोजपूर येथून त्याला अट करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण

कारागृह महानिरीक्षक एनआरके. रेड्डी यांनी दिलेल्या माहिती नुसार,”सात कैदी कारागृहात टीव्ही बघत होते. टीव्ही बघताना या कैंद्यामध्ये भांडण झाले. या भांडणाचे रुपांत मारहाणीत झाले. या कैद्यांमध्ये शकील उल्लाह हाच फक्त पाकिस्तानी होता. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here