घरदेश-विदेशपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर उपचार सुरु

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर उपचार सुरु

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. इस्लामाबाद येथील पाकिस्तानी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना इस्लामाबाद येथील पाकिस्तान इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले. सरकारच्या आदेशानंतर त्यांना या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

भ्रष्टाचार प्रकरणी शरिफ यांना १० वर्षाची शिक्षा

नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम हे दोघे रावलपिंडीच्या अडियाला तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहेत. भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोर्टाने ६ जुलैला दोषी ठरवले होते. याप्रकरणी नवाज शरीफ यांना १० वर्षाची तर मुलगी मरियन हिला सात वर्षाची शिक्षा सुनावली होती.

- Advertisement -

शरिफांना योग्य वैद्यकिय उपचाराची गरज

नवाज शरीफ यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय पंजाब सरकारने केला आहे. कारण आडियाला तुरुंग त्यांच्या प्रशासकिय नियंत्रणाखाली आहे. डॉक्टरांच्या एका टीमने शिफारस केली होती की, नवाज शरीफ यांना योग्य वैद्यकिय उपचार आणि काळजीची गरज आहे. कारण त्यांच्या शरिरामध्ये रक्ताभिसरणाची कमतरता झाल्यामुळे वेदना होत आहेत.

नवाज शरिफ यांची प्रकृती स्थिर

इलेक्ट्रोकार्डियोग्राम केल्यानंतर नवाज शरीफ यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला. सध्या त्यांच्यावर हृदयरोग केंद्रामध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. छातीमध्ये दुखू लागल्याची तक्रार नवाज शरीफ यांनी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना इस्लामाबाद येथील पाकिस्तानी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -