घरदेश-विदेश७ वर्षांनी परत मिळालेली बाईक; त्याने टाकली जाळून

७ वर्षांनी परत मिळालेली बाईक; त्याने टाकली जाळून

Subscribe

गोव्यातील पणजी शहरात एका माणसाने आपली बाईक कोर्टाच्या आवारात जाळून टाकल्याचा गजब प्रकार समोर आला आहे. अनवर राजगुरू याची लाल रंगाची रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ही बाईक  ७ वर्षांपूर्वी ताब्यात घेण्यात आली होती. मात्र, तब्बल ७ वर्षांनंतर परत मिळालेली बाईक पाहून खुष होण्याऐवजी अनवरने रागारागाने कोर्टाच्या आवारातच ती बाईक जाळून टाकली. आपल्या रागाला कोर्ट आणि कोर्टांची दिरंगाई जबाबदार असल्याचं राजगुरूचं म्हणणं आहे. अनवरने बाईक विकत घेताना केलेलं रजिस्ट्रेशन चुकीचं असल्याचं तसंच बाईकची कागदपत्र खोटी असल्याचा आरोप करत, त्याची बाईक ७ वर्षांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाची पूर्ण तपासणी केली गेली आणि मे महिन्यातच अनवरला त्याची बाईक परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले. मात्र, गोवा पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात दिरंगाई दाखवली आणि बाईकची नव्याने कादगपत्र बनवायला उशीर केला.

पोलीस आणि वाहतूक अधिकाऱ्यांच्या बेपरवेशीरपणानंतर अखेर ४ ऑक्टोबरला संध्याकाळी अनवरला त्याची बाईक परत देण्यात आली. त्यावेळी चिडलेल्या अनवरने आपली बाईक गोवा सत्र न्यायालयाचा आवारात नेली आणि जाळून टाकली. अनवरने ही बुलेट १९ मार्च २००९ रोजी खरेदी केली होती. बाईक परत मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षांचा इन्श्युअरन्स प्रियिअम भारावा लागला. त्याशिवाय आरटीओच्या दंडाची रक्कमही अनवरला भरावी लागली. कोर्टाच्या आवारात बाईक जाळल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला शानदार रॉयल एनफिल्डची थंडरबर्ड बाईकचा जळून धूर होताना दिसतो आहे.

- Advertisement -

दरम्यान या घटनेमुळे सरकारी कामातील बेपरवेशीरपणा तसंच सरकारी बाबूंकडून सामान्य माणसांची होणारी पिळवणूक पुन्हा एकदा समोर आली आहे. अनवरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, माझ्यासोबत घडलेल्या अन्यायामुळे मी हताश झालो होतो. शिवाय माझा संतापही अनावर झाला होता. त्यामुळे ती बाईक मी कोर्टाच्या आवारात नेऊन जाळून टाकली.


वाचा: सनी लिओनी एका नव्या वादात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -